घरदेश-विदेशशबरीमाला मंदिराचा निर्णय शिवसेनेला अमान्य; केरळमध्ये पुकारला 'बंद'

शबरीमाला मंदिराचा निर्णय शिवसेनेला अमान्य; केरळमध्ये पुकारला ‘बंद’

Subscribe

केरळमधील शबरीमाला मंदिरात सर्व वयोगटातील महिलांना प्रवेश दिला जावा, असा ऐतिहासिक निर्णय कालच सुप्रीम कोर्टाने दिला होता. या निर्णयावर सर्व देशातून कौतुकाचा वर्षाव होत असताना केरळमधील शिवसेनेने मात्र या निर्णयाचा विरोध केला आहे. शिवसेनेतर्फे १ ऑक्टोबरला केरळ राज्यात १२ तासांचा बंद पुकारण्यात आला आहे.

- Advertisement -

शुक्रवारी सुप्रीम कोर्टाच्या पाच सदस्यीय खंडपीठाने शबरीमाला मंदिरात १० ते ५० वयोगटातील महिलांना प्रवेश दिला जात नसल्याच्या प्रथेविरोधात निर्णय दिला होता. हजारो वर्षांपासून चालत आलेली ही परंपा घटनाबाह्य असल्याचे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी सांगितले होते. संविधानाच्या कलम १४ आणि २५ ने दिलेल्या मूलभुत अधिकारांचे यामुळे हनन होत असल्याची याचिका इंडियन यंग लॉयर्स असोसिएशनने सुप्रीम कोर्टात दाखल केली होती. या याचिकेवरील सुनावणी १ ऑगस्ट रोजी घेण्यात आली आणि त्याच्या निकालाचे वाचन काल (२८ सप्टेंबर) करण्यात आले होते.

तुम्हाला माहितीये – का दिला जात नव्हता शबरीमाला मंदिरात महिलांना प्रवेश?

शबरीमाला मंदिर हे केरळमधील पश्चिम घाटीच्या जंगलात वसलेले आहे. भगवान अयप्पाची या मंदिरात पुजा केली जाते. अयप्पा हे ब्रह्मचारी असल्याकारणाने इथे महिलांना प्रवेश नाकारला जात होता. शुक्रवारी जेव्हा सुप्रीम कोर्टाने आपला निर्णय सुनावला तेव्हा शबरीमाला मंदिराचे मुख्य पुजारी कंदरारू राजीवरु यांनी नाराजी व्यक्त केली होती.

वाचा – शबरीमाला मंदिर महिलांसाठी खुले; सुप्रीम कोर्टाचा आणखी एक मास्टरस्ट्रोक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -