घरदेश-विदेशकाँग्रेसच्या कारवाईनंतर सचिन पायलट यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

काँग्रेसच्या कारवाईनंतर सचिन पायलट यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

Subscribe
सचिन पायलट यांना काँग्रेसविरुद्धच्या बंडखोरीचा फटका बसला आहे. काँग्रेसने पायलट यांच्याविरुद्ध कारवाई करत त्यांना उपमुख्यमंत्री पदावरुन तसंच प्रदेशाध्यक्ष पदावरुन हटवलं आहे. यानंतर सचिन पायलट यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन एका ओळीचं ट्विट करत सचिन पायलट यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

“सत्य को परेशान किया जा सकता है, पराजित नाही” अशी ओळ पोस्ट करत त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सत्याला त्रास दिला जाऊ शकतो मात्र त्याचा पराभव करता येत नाही असा ओळीचा अर्थ होतो. राजस्थानमध्ये बंडखोरी केलेले सचिन पायलट आता नेमकं काय करणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. सचिन पायलट यांनी आपल्या ट्विटर बायोवरून उपमुख्यमंत्री लिहिलेलं हटवलं आहे आणि कुठेही कॉंग्रेसचा उल्लेख केलेला नाही आहे. सचिन पायलट यांचे ट्विटर बायोमध्ये टोंकचे आमदार, माजी आयटी, दूरसंचार आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री, भारत सरकार, कमिशनड ऑफिसर, टेरिटोरियल आर्मी, असं लिहिलं आहे.

- Advertisement -

हेही वाचा – पायलट यांना उपमुख्यमंत्री पदासह प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवलं


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -