घरदेश-विदेशजयंतीनिमित्त शिवरायांना मानवंदना!

जयंतीनिमित्त शिवरायांना मानवंदना!

Subscribe

आज शिवजयंती असल्याने संपूर्ण देशभरात वेगवेगळ्या पद्धतीने शिवजयंती ही साजरी होताना दिसत आहे. अनेक मान्यवरांनी सोशल मीडियावरुन शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

देशभरात जागोजागी मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी केली जात आहे. आज संपूर्ण देशभरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. तसेच अनेक नामवंत सेलिब्रिटींनी महराजांच्या जयंतीनिमित्त आपल्या सोशलमीडियाच्या माध्यमातून महाराजांना आदरांजली वाहिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवजयंतीनिमित्त ट्विटरवर शिवाजी महाराजांना विनम्र अभिवादन केले. तसेच त्यांनी त्यासोबत एक व्हिडीओदेखील शेअर केला आहे. त्यामध्ये त्यांनी, ‘असा राजा होणे नाही, म्हणत शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त मी त्यांच्यासमोर नतमस्तक होतो’, असे म्हटले आहे. शिवाजी महाराजांचे व्यक्तीमत्व बहुआयामी होते. सत्य आणि न्यायासाठी लढणारे ते एकमेव आदर्शन राजे होते. जगामध्ये शिवाजी महाराजांच्या महान व्यक्ती सापडणार नाही. समाजातील सर्व पातळीतील लोकांना आपले राजे वाटतात, असे त्यांनी ट्विटमध्ये लिहिले आहेत.

- Advertisement -

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनीही ट्विटरवरुन महाराजांना नमन केले आहे. खऱ्या अर्थाने रयतेचे राजे आहेत, असे त्यांनी ट्विट केले आहे. सर्व समाजातील मावळे एकत्रित करून त्यांनी स्वराज्य उभारलं आणि जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न केला, त्यांचं जीवन आणि राज्य कारभार जगासाठी अनुकरणीय आहे. महान राजास जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन, असे ट्विट केले आहे. शेवटी #शिवाजीमहाराजकिजय हॅशटॅगही दिला.

- Advertisement -

मास्टर बॉस्टर सचिन तेंडुलकर यांनी ही छत्रपती शिवाजी महाराजांना ट्विटरवरुन अभिवादन केले आहे. त्यांनी ट्विटर अकाऊंटवर सर्वांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

राजकारणी, क्रीकेटर यांनी शिवजयंतीनिमित्त ट्विट केले आहेत. तसेच कलाकारांनी ही छत्रपती शिवाजी महाराजांना ट्विटरवरुन अभिवादन केले आहे. बिग बी अमिताभ बच्चन यांनी गुरु रविदास जयंती आणि शिवाजी जयंती प्रणाम आणि नमन, असे ट्विट केले आहे.

सैराट चित्रपटाचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनीही ट्विटरद्वारे छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना दिली आहे. यांनी न्यूयॉर्कमध्ये शिवाजी महाराजांचा पोषाख परिधान केलेल्या तरूणासोबत सेल्फी काढून ट्विट केला आहे. त्या ट्विटमध्ये असा सेल्फी काढण्याचा मोह कधी तरीच होतो शिवजयंती, असे लिहिले आहे.

मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीतील अभिनेता रितेश देशमुख यांनीही छत्रपती शिवजी महाराजांना मानवंदना दिली आहे. ट्विटरवर त्यांनी एक व्हिडीओ शेअर केली आहे. त्यामध्ये त्यांनी स्वत: शिवाजी महाराजांचे चित्र काढत शिवभक्तांना शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

भारतीय सेनेच्या मराठा बटालियन यांनीसुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांना ट्विटरद्वारे अभिवादन केले आहे. तसेच जवानांनी शिवजयंती साजरी करतानाचा हा एक व्हिडिओ शेअर केला आहे.

महाराष्ट्रतील अनेक गड-किल्ल्यांवरही शिवजयंती उत्सव साजरे केले जात आहेत. समृद्ध आणि कणखर महाराष्ट्राचा पाया रचणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना आज देशभरातील रयत, शिवभक्त यांच्याकडून अभिवादन करण्यात येत आहे. तसेच विविध माध्यमातून अनेकांनी छत्रपती महाराजांना नमन केल्याचे पाहायला मिळाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -