घरदेश-विदेश२६/११ हल्ल्यात पाकिस्तानचा दोष नाही - सॅम पित्रोदा

२६/११ हल्ल्यात पाकिस्तानचा दोष नाही – सॅम पित्रोदा

Subscribe

गांधी घराण्याचे निकटवर्तीय सॅम पित्रोदा यांनी भारतीय वायुदलाने केलेल्या एअर स्ट्राईकवर प्रश्न उपस्थित केला आहे. हा एअरस्ट्राईक खरच झाला होता का? असा प्रश्न पित्रोदा यांनी विचारला आहे. यासोबतच २६/११ हल्ल्यात पाकिस्तानचा दोष नाही, असेही पित्रोदा म्हणाले आहेत.

२६ नोव्हेबर २००८ रोजी मुंबईत मोठा दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यासंदर्भात इंडीयन ओव्हरसीस काँग्रेसचे प्रमुख सॅम पित्रोदा यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. २६/११ हल्ल्यात हल्ला करणारे ८ दहशतवादी दोषी होते. यात पाकिस्तानचा दोष नाही, असे पित्रोदा म्हणाले आहेत. एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. दरम्यान, भारतीय वायुदलाकडून एअर स्ट्राईक केल्यानंतरपासून पाकिस्तानच्या लष्कराकडून वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जात आहे. परंतु, तरीही सॅमा पित्रोदा यांनी पाकिस्तानशी संवाद साधून चांगले संबंध प्रस्थापित करण्याचा सल्ला दिला गेला आहे. सॅम पित्रोदा हे गांधी घराण्याचे निकटवर्तीय आहेत.

- Advertisement -

३०० दहशतवादी मारल्याचे सिद्ध करुन दाखवा – सॅम पित्रोदा

भारतीय वायुदलाने नियंत्रण रेषा पार करुन पाकिस्तानच्या बालाकोट येथे हल्ला केला होता. भारतीय वायुदलाने जैश ए मोहम्मद संघटनेचे बालाकोट येथील दहशवाद्यांचे तळे उद्धवस्त केले होते. या हल्ल्यात २०० ते ३०० दहशतवादी मारले गेल्याचा दावा केला जात होता. परंतु, जर खरच एवढे दहशतवादी मारले गेले असतील तर ते सिद्ध करुन दाखवावे, असे सॅम पित्रोदा म्हणाले आहेत.

‘एअर स्ट्राईकवर प्रश्न विचारणे हे माझे कर्तव्यच’

यासंदर्भात बोलताना सॅम पित्रोदा म्हणाले की, एअर स्ट्राईकमध्ये किती दहशतवादी मारले गेले, हे मला माहित पडायलाच हवे. कारण मी न्यूयॉर्क टाइम्स आणि इतर वृत्तपत्रांच्याही बातम्याही वाचतो. त्यामुळे खरच एअर स्ट्राईक करण्यात आला आहे का? आपण खरच ३०० लोकांना मारले आहे का? मला माहित नाही. पण एक देशाचा नागरिक म्हणून हे जाणून घेणं माझं कर्तव्य आहे. याचा अर्थ असा होत नाही की, मी देशद्रोही आहे. याचा अर्थ असा होत नाही की मी इकडची किंवा तिकडची बाजू घेत आहे. खरं काय ते आपल्याला माहित पडयलाच हवे. जर कोणी म्हणत असेल ३०० दहशतवाद्यांना मारले, तर त्याचा पुरावा दाखवला पाहिजे. जागतिक माध्यमांमध्ये एकही दहशतवादी मारल्यागेल्याची बातमी समोर आलेली नाही. त्यामुळे देशाचा नागरिक म्हणून किती लोक मारले गेले, हे जाणून घेणं माझं कर्तव्य आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -