घरदेश-विदेशराहुल फेल झाल्यामुळे प्रियांकाला आणलं - संबित पात्रा

राहुल फेल झाल्यामुळे प्रियांकाला आणलं – संबित पात्रा

Subscribe

काँग्रेसने प्रियांका गांधी यांची पूर्व उत्तर प्रदेशच्या सरचिटणीस पदी नियुक्ती केली आहे. प्रियांकाच्या या नियुक्तीवर भाजपने काँग्रेसवर टीका केली आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने प्रियांका गांधी यांना राजकारणात उतरवले आहे. काँग्रेसने प्रियांकाला पूर्व उत्तर प्रदेशच्या सरचिटणीसपदी नियुक्ती केली आहे. त्यामुळे देशाच्या राजकारणाला एक वेगळे वळण येताना दिसत आहे. दरम्यान, काँग्रेसच्या या निर्णयावर भाजपने टीका केली आहे. राहुल गांधी नापास झाल्यामुळे काँग्रेसने प्रियांकाला आणले आहे, अशी तिरकस टीका भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी केली आहे.

‘काँग्रेस पुन्हा गांधी कुटुंबातच कुबड्यांचा आधार शोधत आहे’

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रियांका गांधीची पूर्व उत्तर प्रदेशच्या सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर पश्चिम भागाचे नेतृत्व ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. दरम्यान, भाजपने काँग्रेसच्या या निर्णयावर टीका केली आहे. भाजपने काँग्रेसवर घराणेशाहीचा आरोप केला आहे. ‘काँग्रेस पुन्हा गांधी कुटुंबातच कुबड्यांचा आधार शोधत आहे. नेहरु, इंदिरा, राजीव, सोनिया, राहुल यांच्यानंतर आता प्रियांकाचे प्रमोशन करण्यात आले आहे’, असे संबित पात्रा म्हणाले आहेत.

- Advertisement -

आगामी निवडणुकीसाठी काँग्रेसची जय्यत तयारी

काँग्रेसमध्ये सध्या आगामी लोकसभा निवडणुकीची जय्यत तयारी सुरु आहे. काँग्रेस या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जाहिरनामा देखील बनवत आहे. या जाहिरनाम्यामध्ये शेतकरी आणि रोजगार संबंधित महत्त्वाचे मुद्दे असण्याची शक्यता आहे.


हेही वाचा – प्रियांका गांधींची राजकारणात एन्ट्री; काँग्रेस सरचिटणीस पदी नियुक्ती

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -