घरदेश-विदेशचंदा कोचर सक्तीच्या रजेवर;व्हिडीओकॉन कर्जवाटप प्रकरणात होणार चौकशी

चंदा कोचर सक्तीच्या रजेवर;व्हिडीओकॉन कर्जवाटप प्रकरणात होणार चौकशी

Subscribe

व्हिडीओकॉन कर्जवाटप प्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत चंदा कोचर या बेमुदत रजेवर असतील. त्यांच्या जागी संदीप बक्षी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान बँकेने चंदा कोचर या नियोजित रजेवर असल्याचे प्रसिद्धी पत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.

व्हिडीओकॉन समुहाला दिलेले कर्ज आयसीआयसी बँकेच्या सीईओ चंदा कोचर यांना महागात पडणार का? असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. व्हिडीओकॉन कर्जवाटप प्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत चंदा कोचर या बेमुदत रजेवर राहतील अशी घोषणा आयसीआयसीआय बँकेने केली. चंदा कोचर यांना चौकशी संपेपर्यंत पदमुक्त करण्यात आले असून त्यांच्या जागी संदीप बक्षी यांच्याकडे हंगामी कारभार सोपवण्यात आलेला आहे. व्हिडीओकॉन समुहाला कर्ज देताना कुटुंबियांचे हितसंबंध सांभाळले असा आरोप चंदा कोचर यांच्यावर आहे. सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. चंदा कोचर या नियोजित रजेवर असून बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर कायम राहतील असे बँकेने प्रसिद्ध पत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे. कोचर यांच्या अनुपस्थितीत आयसीआयसीआय बँकेचे सर्व कार्यकारी संचालक तसेच व्यवस्थापकिय अधिकारी संदीप बक्षी यांच्याकडे कार्य अहवाल देतील. सोमवारी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत चौकशी होईपर्यंत चंदा कोचर या पदापासून लांब राहतील असा यावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

काय आहे व्हिडीओकॉन कर्ज प्रकरण?

वेणुगोपाल धूत यांच्या व्हिडीओकॉन ग्रुपला २० बँकांच्या ग्रुपने कर्ज दिले. ज्यामध्ये आयसीआयसीआय बँकेचा वाटा हा १० टक्के होता. आयसीआयसीआय बँकेकडून कर्ज घेतल्यानंतर वेणुगोपाल धूत यांनी चंदा कोचर यांचे पती दिपक यांच्या साथीने न्यू पॉवर रिन्यूएबल कंपनीची सुरूवात केली. ज्यामध्ये दिपक कोचर याची ५० टक्के भागीदारी होती. यानंतर शेअरहोल्डर अरविंद गुप्ता यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून भ्रष्टाचाराची तक्रार केली. तसेच वेणुगोपाल धूत आणि चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर यांच्या नातेवाईकांनी मिळून डिसेंबर २००८ साली एका कंपनीची स्थापना केली. या कंपनीला आयसीआसीआय बँकेने ६४ कोटी रूपयांचे कर्ज दिले. त्यानंतर काही दिवसांमध्ये कंपनीची मालकी अवघ्या ९ लाख रूपयांना दिपक कोचर यांना मिळाली.

- Advertisement -

कोण करणार चंदा कोचर यांची चौकशी ?

सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायमूर्ती बी.एन. श्रीकृष्ण चंदा कोचर यांच्यावरील कर्जवाटप प्रकरणात झालेल्या आरोपांची चौकशी करणार आहेत. आयसीआयसीआय बँकेच्या संचालक मंडळाने देखील बोर्डाने व्हिडीओकॉन कर्ज प्रकरणाची चौकशी केली आहे. माजी न्यायमूर्ती बी.एन. श्रीकृष्ण हे अर्थतज्ञ्ज असल्याने यातून सत्य बाहेर येईल असा विश्वास आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -