घरदेश-विदेशफक्त १ रूपयांत मिळणार सॅनिटरी नॅपकिन

फक्त १ रूपयांत मिळणार सॅनिटरी नॅपकिन

Subscribe

जन औषधी केंद्रामध्ये अडीच रूपयांना एक जैवविघटनशील नॅपकिन मिळत होते आता ते केवळ एक रूपयामध्ये

आजपासून सरकारी जन औषधी केंद्रामध्ये फक्त एक रूपयामध्ये सॅनिटरी नॅपकिन मिळणार आहे. महिलांच्या आरोग्याकरिता सॅनिटरी नॅपकिन अनुदानित किंमतीमध्ये उपलब्ध केले आहे, अशी माहिती रसायने आणि खते राज्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी दिली आहे.

यापुर्वी जन औषधी केंद्रामध्ये अडीच रूपयांना एक जैवविघटनशील नॅपकिन मिळत होते आता ते केवळ एक रूपयामध्ये महिलांना मिळणार आहे. त्यामुळे चार नॅपकिन्सचे पाकिट १० रूपयांना मिळत होते आता ते केवळ ४ रूपयांमध्ये विकत घेता येणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा – पावसाळ्यात उद्भवणाऱ्या ‘हेपटायटिस ई’पासून सावधान!


देशभरातील ५५०० जन औषधी केंद्रांमध्ये ‘सुविधा’

जन औषधी केंद्रामध्ये जैवविघटनशील सॅनिटरी नॅपकिन्स आता एक रुपयांत उपलब्ध करण्यात आले. संपुर्ण देशात असणाऱ्या ५५०० जन औषधी केंद्रामध्ये ‘सुविधा’ या नावाने हे नॅपकिन्स उपलब्ध असणार आहे. यासंदर्भात अधिक माहिती देताना रसायने आणि खते राज्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी सांगितले की, ‘सॅनिटरी नॅपकिन उत्पादक सध्या उत्पादन खर्चामध्ये नॅपकिन पुरवत होते. ही किंमत ६० टक्क्यांनी खाली आणण्यासाठी सरकार अनुदान देणार आहे,

एक वर्षात २.२ कोटी नॅपकिनची विक्री

मार्च २०१८ मध्ये जन औषधी केंद्रांत सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करण्याची योजना जाहीर करण्यात आली होती. ही योजना मे २०१८ पासून जन औषधी केंद्रांत राबविण्यात आली. या योजनेअंतर्गत मागील वर्षात सुमारे २.२ कोटी नॅपकिनची विक्री झाली होती. मात्र, आता किंमत कमी झाल्याने सॅनिटरी नॅपकिनची विक्री अधिक होण्याची शक्यता आहे. किंमत जरी कमी असली तरी, नॅपकिनचा दर्जा, किंमत आणि उपलब्धता यावर भर देण्यात आला आहे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -