घरदेश-विदेशबाबरी मशीद १७ मिनिटांत उध्वस्त केली; आता राममंदिर...

बाबरी मशीद १७ मिनिटांत उध्वस्त केली; आता राममंदिर…

Subscribe

बाबरी मशीद प्रकरणातील याचिकाकर्ते मोहम्मद इक्बाल अन्सारी यांनी, राम मंदिर बांधण्याबाबत अध्यादेश आणण्यावर आपला काहीच आक्षेप नसल्याचे म्हटले होते.

अयोध्या राममंदिराचे प्रकरण सध्या तूफान गाजत असताना, शिवसनेचे नेते आणि खासदार संजय राऊनत यांनी या मुद्द्यावरुन पुन्हा एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. ‘१९९२ साली बाबरी मशीद पाडण्यासाठी रामभक्तांना केवळ १७ मिनिटं लागली होती. त्यामुळे आता राम मंदिर बांधण्यासाठी अध्यादेश आणायला जास्त वेळ लागणार नाही’, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याचा पार्श्वभूमीवर संजय रावतांनी केलेलं हे वक्तव्य नव्या वादाला तोंड फोडण्याची शक्यता आहे. यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले, की राष्ट्रपती भवनापासून ते उत्तरप्रदेशच्या विधानसभेत भाजपचीच सत्ता आहे आणि राज्यसभेतील बहुतांश सदस्य हे राम मंदिराच्या बाजून आहेत. राम मंदिर बांधण्याच्या विरोधात जर कुणी असेल तर त्याला या देशात शांततेत राहता येणार नाही, असा उघड उघड धमकीवजा इशाराही त्यांनी यावेळी दिला. बाबरी मशीद प्रकरणातील याचिकाकर्ते मोहम्मद इक्बाल अन्सारी यांनी, राम मंदिर बांधण्याबाबत अध्यादेश आणण्यावर आपला काहीच आक्षेप नसल्याचे म्हटले होते. त्यानंतर आता संजय राऊतांच्या वक्तव्यामुळे राम मंदिराचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

 


बाबरी मशीद प्रकरण थोडक्यात…

अलाहाबाद उच्च न्यायालयाने २०१० मध्ये दिलेल्या निर्णयानुसार, हा वादग्रस्त भूखंड सुन्नी वक्फ बोर्ड,  राम लल्ला आणि निर्मोही आखाडा यांना ३ समान भागात विभागून देण्यात आला होता. २० ऑक्टोबरला या निर्णयाविरोधात एक याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र, हा खटला सर्वोच्च न्यायालयाने जानेवारी २०१९ पर्यंत तहकूब केला होता. १५२८ साली मुघल बादशाह बाबरने अयोध्येत बाबरी मशीद बांधली होती. ६ डिसेंबर १९९२ हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी याच भूभागावर राम मंदिर होते असे म्हणत ही मशीद पाडली होती.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -