घरदेश-विदेशअयोध्या दौऱ्यासंदर्भात संजय राऊतांनी घेतली योगी आदित्यनाथांची भेट

अयोध्या दौऱ्यासंदर्भात संजय राऊतांनी घेतली योगी आदित्यनाथांची भेट

Subscribe

शिवसेनेच्या अयोध्या दौऱ्याची तयारी सुरू झाली आहे. आज शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली.

येत्या २५ नोव्हेंबरला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आयोध्येच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्याच्या तयारीला सुरुवात झाली आहे. त्याचा एक भाग म्हणून आज शिवसेना नेता आणि खासदार संजय राऊत यांनी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली. दोघांमध्ये उत्तरप्रदेशच्या लखनऊ येथे बैठक असून त्यामध्ये उद्धव ठाकरेच्या अयोध्या दौऱ्याविषयी चर्चा करण्यात आली. गेल्या अनेक वर्षापासून संत समाज, विश्व हिंदू परिषद, शिवसेना आणि हिंदूत्ववादी संघटनांकडून राम मंदिर बांधण्याची मागणी केली जात आहे. याच पार्श्वभूमिवर उद्धव ठाकरे अयोध्येचा दौरा करणार आहेत.

जनताच भाजपला वनवासात पाठवेल

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी भेट झाल्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी असे सांगितले की, शिवसेना पक्ष गेल्या अनेक वर्षापासून राम मंदिराचा मुद्दा उचलून धरत आहे.राम मंदिराचा मुद्दा न्यायालयाचा मुद्दा नसून आमच्यासाठी तो श्रध्देचा विषय असल्याची प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे. भाजपने आगामी लोकसभा निवडणूक २०१९ पूर्वी राम मंदिर बांधण्यासाठी संसदेत अद्यादेश आणावा. नाही तर जनताच भाजपला वनवासात पाठवेल असा इशारा राऊत यांनी दिली आहे.

- Advertisement -

उद्धव ठाकरे यांचे आयोध्येत स्वागत

देशातील हिंदुंसाठी राम मंदिराचा मुद्दा महत्त्वाचा आहे. सगळ्यांचे मत आहे की त्याच जागेवर राम मंदिर बांधण्यात यावे असे संजय राऊत यांनी सांगितले. संजय राऊत यांनी योगी आदित्यनाथ यांची भेट घेऊन येत्या २५ नोव्हेंबरला उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौरेविषयी परवानगी मागितली तसंच त्यांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करण्याची मागणी केली. तर योगी आदित्यनाथ यांनी ‘उद्धव ठाकरेंचे अयोध्येत स्वागत आहे’, असे या बैठकीदरम्यान सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -