घरदेश-विदेशपायी संसद मार्च स्थगित, संयुक्त किसान मोर्चाचा निर्णय़

पायी संसद मार्च स्थगित, संयुक्त किसान मोर्चाचा निर्णय़

Subscribe

लाल किल्ल्यातील हिंसाचाराची नैतिक जबाबदारी स्विकारली

दिल्लीतील हिंसाचाराच्या घटनेनंतर संयुक्त किसान मोर्चाने येत्या १ फेब्रुवारीला जाहीर केलेला पायी संसद मार्च तूर्तास स्थगित केला आहे. मार्च स्थगित झालेला असला तरीही आंदोलन मात्र चालूच राहील असे मोर्चाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. लाल किल्ला परिसरात झालेल्या संपुर्ण हिंसाचाराची नैतिक जबाबादारी संयुक्त किसान मोर्चा स्विकारत आहे असे पत्रकार परिषदेत स्पष्ट करण्यात आले. येत्या ३० जानेवारीला महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने शेतकऱ्यांमार्फत एक दिवसाचे उपोषण करणार असल्याचेही सांगण्यात आले. संयुक्त किसान मोर्चामार्फत बुधवारी एक आपत्कालीन बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीनंतर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिपसिद्धू यांचा देशभरात सामाजिक बहिष्कार करण्याचे आवाहन करण्यात आले. संयुक्त किसान मोर्चा ही ३२ शेतकरी संघटनांमध्ये समन्वयाची भूमिका साधणारी अशी संघटना आहे.

- Advertisement -

केंद्र सरकार आतापर्यंतच्या शेतकऱ्यांच्या शांततामय आंदोलनानंतर संपुर्णपणे बिथरली आहे. त्यामुळेच शेतकऱ्यांच्या आंदोलनाविरोधात किसान संघर्ष मजदूर समिती आणि इतरांना हाताशी घेऊन एक वाईट षडयंत्र रचण्यात आले. किसान मजदूर संघर्ष समितीने आंदोलनकर्त्या शेतकरी संघटनांच्या आधीच नियोजित वेळेपेक्षा दोन तास आधीच रिंग रोडवर रॅलीला सुरूवात केली होती. त्यामुळे शेतकऱ्यांचा शांतीपूर्ण आणि मजबूत संघर्षाच्या निश्चयात बाधा आणण्याचे काम या संघटनांनी केले. पण यापुढच्या काळातही शांततामय मार्गाने हा संघर्ष कायम ठेवण्याचा निर्णय़ शेतकऱ्यांनी केला आहे. सरकार, प्रशासन, किसान मजदूर संघर्ष समिती आणि असामाजिक तत्वांची आम्ही निंदा करतो असेही यावेली सांगण्यात आले. मंगळवारी झालेल्या हिंसेमुळे शेतकरी विरोधी ताकदीचा पर्दाफाश झाला आहे.

 

- Advertisement -

 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -