घरदेश-विदेशसपना चौधरीच्या कार्यक्रमात एकाचा मृत्यू

सपना चौधरीच्या कार्यक्रमात एकाचा मृत्यू

Subscribe

बिहार येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात डान्सर सपना चौधरी येणार म्हणून प्रेक्षकांनी एकच गर्दी केली. या गर्दीत झालेल्या चेंगरा चेंगरीत एकाचा मृत्यू झाला आहे.

बिहार येथे आयोजित छटपूजेच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या चेंगरा चेंगरीत एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही गर्दी डान्सर सपना चौधरीच्या कार्यक्रमासाठी जमली होती. कार्यक्रमादरम्यान आलेल्या लोकांनी सपनाचा डान्स बघण्यासाठी गर्दी केली होती. बिहार येथील बेगूसराय जिल्ह्यात हा कार्यक्रम ठेवण्यात आला. कार्यक्रमादरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केल्यानंतर ही गर्दी अधिकच घाबरली. घाबरून पळाल्यामुळे येथे चेंगरा चेंगरी झाली.

- Advertisement -

कसा घडला प्रकार

बेगूसराय येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात सपना चौथरी येणार होती. ११ व्या भरौल छट महोत्सवात ती डान्स करत होती. सपना ऐवजी कलाकार सुदेश भोसले आणि हंस राज हंस यांनी आपला कार्यक्रम सादर केले. संध्याकाळी सपनाची एक झलक बघण्यासाठी लोकांनी या ठिकाणी गर्दी केली. रात्री १२ च्या सुमारास सपना स्टेज वर पोहोचली. कार्यक्रमादरम्यान तिचे फॅन्स स्टेज जवळ येण्याचा प्रयत्न करत होते. यामध्ये झालेल्या भांडणात फॅन्सने एकमेकांवर खूर्चा फेकण्यास सुरूवात केली. या कार्यक्रमाला ५० हजार प्रेक्षक उपस्थित होते. गर्दीमुळे झालेल्या चेंगराचेंगरीत झाली. त्यामुळे सपनाने २ गाणे गायले आणि कार्यक्रम संपवला. आयोजकांनीही गर्दीला बघून कार्यक्रम बंद केला. आपल्या कार्यक्रमाबद्दल सपनाने आपल्या इन्स्टाग्राम वरून माहिती दिली होती. सपना येणार असल्याची माहिती लोकांना कार्यक्रमापूर्वीच मिळाली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -