घरदेश-विदेशस्वयंघोषित अध्यात्मिक गुरु रामपाल दोन हत्या प्रकरणात दोषी

स्वयंघोषित अध्यात्मिक गुरु रामपाल दोन हत्या प्रकरणात दोषी

Subscribe

स्वयंघोषित गुरु रामपाल याला हिस्सार कोर्टाने दोन हत्या प्रकरणात दोषी ठरवले आहे. रामपालच्या शिक्षेवर येत्या १६ आणि १७ ऑक्टोबरला रामपालला शिक्षा सुनावली जाणार आहे. नेमकी काय शिक्षा सुनावली जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

स्वयंघोषित अध्यात्मिक गुरु आणि हरयाणाच्या सतलोक आश्रमाचे संस्थापक अध्यक्ष रामपाल याला दोन हत्येच्या आरोपामध्ये हिसार कोर्टाने दोषी ठरवले आहे. सुरक्षेच्या कारणास्तव रामपालला कोर्टात आणण्यात आले नव्हते. सेंट्रल जेलमध्येच सुनावणी करण्यात आली. अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधिश डी. आर. चालिया यांनी याप्रकरणाची सुनावणी केली. येत्या १६ आणि १७ ऑक्टोबरला रामपालला शिक्षा सुनावली जाणार आहे.

- Advertisement -

पहिले प्रकरण काय होते

कोर्टाने रामपाल याला दोन हत्येच्या आरोपाखाली जरी दोषी ठरवले असले तरी अद्याप शिक्षा सुनावण्यात आली आहे. रामपालच्या सतलोक आश्रमात १८ नोव्हेंबर २०१४ रोजी एका महिलेचा मृतदेह आढळून आला होता. संशयास्पद अवस्थेत या महिलेचा मृतदेह आढळला होता. त्यामुळे रामपालच्या आश्रमावर अनेक प्रश्न उपस्थित केले गेले. मृत्यूचे कारण स्पष्ट नसल्यामुळे पोलिसांनी मोठ्या शर्थीने प्रयत्न करुन महिलेचा मृतदेह बाहेर काढून पोस्टमॉर्टमसाठी पाठवला.

दुसरे प्रकरण काय होते

दुसऱ्या प्रकरणात रामपालला अटक करण्यासाठी पोलीस आले होते. मात्र रामपालचे भक्त पोलिसांना आश्रमात येऊन देत नव्हते. पोलिसांनी धक्काबुक्की करत होते. पोलीस आणि या भक्तांमध्ये तब्बल १० दिवस वाद सुरु होता. रामपालचे भक्त पोलिसांवर गोळ्या झाडत होते, दारुगोळे फेकत होते. पोलिसांना अडवण्याचा प्रयत्न करत होते. यावेळी झालेल्या हिंसाचारात चार महिला आणि एका मुलाचा मृत्यू झाला होता.

- Advertisement -

रामपालच्या अटकेसाठी ५० कोटी खर्च

रामपालला अटक करण्यासाठी हरियाणा पोलिसांना खूप मेहनत तर करावी लागलीच पण त्याचसोबत पैसा देखल खर्च करावा लागला. १८ दिवसानंतर पोलिसांनी रामपालला अटक केली. या पूर्ण ऑपरेशनसाठी राज्य पोलिसांना ५० कोटीपेक्षा जास्त खर्च करावा लागला. या दरम्यान ६ लोकांचा मृत्यू झाला तर २५० पेक्षा अधिक जण जखमी झाले होते. रामपालला अटक करताना अनेक पोलीस जखमी झाले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -