घरदेश-विदेशअखेर सौदीतील महिलांना मिळाले ड्रायव्हिंग लायसन्स

अखेर सौदीतील महिलांना मिळाले ड्रायव्हिंग लायसन्स

Subscribe

आपल्या देशात आपण नेहेमीच महिलांना वाहन चालवतांना आपण बघत आलो आहोत. महिलांचे वाहन चालवणे हे गैर नसून त्यांनाही पुरुषांप्रमाणेच लायसंन्स दिले जाते. मात्र जगातील काही देश असेही आहेत ज्यामध्ये पुरुष व स्त्रीयांमध्ये भेदभाव केला जातो. मागील अनेक दक्षकापासून महिलांना वाहन चालवण्यावर बंदी असलेल्या रुढीला मोडून सौदी अरेबियातील महिलांना अखेर ड्रायव्हिंग लायसन्स देण्यात आले आहे. महिलांना ड्रायव्हिंग करण्यास बंदी असल्याने तेथे अनेक वर्षांपासून महिलांना लायसन्स दिले जात नव्हते. अनेक वर्षांच्या बंदीनंतर मिळालेल्या लायसन्समुळे तेथील महिलांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

सौदी अरेबियात स्त्री- पुरुष समानता यावी यासाठी तेथील प्रिंस मोहम्मद बिन सलमान प्रयत्न करत आहेत. या प्रयत्नातंर्गत २ हजार महिलांना ड्रायव्हिंग लायसन्स देण्याचा निर्णय घेण्यात आला. ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्यासाठी महिलांना २४ जून पर्यंत अर्ज करता येणार आहे. सौदीत महिलांना कोणताही निर्णय घेण्यासाठी पुरुषांची परवानगी घेणे बंधनकारक आहे. महिलांनी ड्रायव्हिंग करायची नाही, असे आदेश असल्यामुळे महिलांना इच्छा नसताना ही ड्रायव्हर करावा लागत होता. त्यामुळे महिलांना ड्रायव्हिंग लायसन्स देण्याची मागणी तेथील महिलांकडून केली जात होती. लायसन्स मिळवण्यासाठी महिलांना १८ वर्ष पूर्ण असणे गरजे आहे. याच बरोबर सौदीच्या पाच शहरांमध्ये महिलांसाठी विशेष ड्रायव्हिंग प्रशिक्षण केंद्र स्थापन केली जाणार आहेत. ज्या महिलांकडे देशा बाहेरुन लायसन्स मिळाले आहेत अशा महिलांना फक्त टेस्ट ड्राईव्ह देऊन लायसन्स मिळणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -