‘हज’ यात्रेसाठी येताय; पण जरा थांबा, कारण…

जगभरातील मुसलमान यंदाच्या वर्षी हज यात्रेला येण्यासाठी तयारी करत असतील तर त्यांनी तूर्तास थांबावे, असे आवाहन सौदी अरेबियाने केले आहे.

Saudi
saudi arabia says don't come to haj yatra due to coronavirus
'हज' यात्रा

जगभरात कोरोनाच्या महामारीने कहर केला आहे. या महामारीने सौदीला घेरले आहे. त्यामुळे जगभरातील मुसलमान यंदाच्या वर्षी हज यात्रेला येण्यासाठी तयारी करत असतील तर त्यांनी तूर्तास थांबावे, असे आवाहन सौदी अरेबियाने केले आहे. पाकिस्तानच्या दि डॉन या वृत्तपत्राने हे वृत्त दिले आहे.

सौदी अरेबिया यात्रेकरूंची सेवा करण्यास आम्ही पूर्णपणे तयार आहोत. परंतु, सध्याच्या परिस्थितीत आपण जागतिक महामारीत आहोत. आम्ही मुस्लिम नागरिकांच्या आरोग्याचे रक्षण करत आहोत, म्हणूनच आम्ही जगभरातील मुस्लिम बांधवांना सध्याची परिस्थिती पाहता हज यात्रेसाठी करार करू नका, असे आवाहन करत आहोत, असे हज मंत्री मोहम्मद बेन्टेन यांनी सांगितले आहे. या वर्षाची हज यात्रा पुढे ढकलली जाणार कि नाही याबाबत सौदीने स्पष्ट केले नाही. गेल्या वर्षी अडीच दशलक्ष लोक हज यात्रेसाठी आले होते. हे सौदी अरेबियाचे मुख्य आर्थिक स्रोत आहे. सौदीमध्ये सामाजिक अंतर ठेवण्यास नागरिकांना सांगण्यात आले आहे. या ठिकाणी आतापर्यंत १ हजार ५६३ कोरोना संसर्ग झालेले नागरिक समोर आले आहेत. त्यात १० जणांचा मृत्यू झाला आहे.


हेही वाचा – धक्कदायक! १२ तासात कोरोनाचे ४३ नवे पॉझिटिव्ह रुग्ण