हनुमान दलित असून मनुवाद्यांचा गुलाम – सावित्रीबाई फुले

हनुमान दलित असून ते मनुवादी लोकांचा गुलाम होते असे खळबळजनक वक्तव्य बहारिच येथील भाजपच्या खासदार सावित्रीबाई फुले यांनी केला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे पुन्हा राजकारण तापले आहे.

Delhi
Bjp MP savitribai phule
भाजप खासदार सावित्रीबाई फुले

ऐन निवडणुक काळामध्ये गेल्या काही दिवसापासून हनुमानावरुन राजकारण सुरु आहे. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हनुमान दलित होते असा दावा केला होता. तेव्हा पासून खऱ्या वादाला सुरुवात झाली आणि हनुमान कोण होते याच्यावर राजकारण सुरु झाले. त्यानंतर हनुमान आदिवासी होते, हनुमान जैन होते असा दावा अनेक नेत्यांनी केला होता. मात्र आता हनुमान दलित असून ते मनुवादी लोकांचा गुलाम होते असे खळबळजनक वक्तव्य बहारिच येथील भाजपच्या खासदार सावित्रीबाई फुले यांनी केला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे पुन्हा राजकारण तापले आहे.

सावित्रीबाई फुले यांनी असे वक्तव्य केले आहे की, दलित आणि मागासवर्गियांना वानर आणि राक्षस असे संबोधले जायचे. हनुमान हे मुनष्यप्राणी होते. त्यांनी आयुष्यभर रामाची सेवा केली. तरीही त्याच्या पाठीला शेपूट जोडून चेहरा विचित्र करुन वानर ठरविण्यात आले. दलित असल्याने हनुमान यांना आयुष्यभर अपमान सहन करावा लागला. दलितांना माणूस समजण्यात येत नाही त्याचे हनुमान प्रतीक असल्याचे मत सावित्रीबाई फुले यांनी व्यक्त केले आहे.

हेही वाचा – 

हनुमान जैन होते!

नंदकुमार साय म्हणाले, हनुमान दलित होते

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here