‘पाकिस्तान मुर्दाबाद’ बोला आणि डिस्काऊंट मिळवा!

'पाकिस्तान मुर्दाबाद' बोलत मिळवा चिकन पीसवर १० रुपये डिसकाऊंट

Chhattisgarh
Say Pakistan Murdabad at this Chhattisgarh food stall, get Rs 10 off on chicken leg piece
'पाकिस्तान मुर्दाबाद' बोलत मिळवा यावर डिसकाऊंट

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या ताफ्यावर केलेल्या भ्याड हल्ल्यात ४० हून अधिक जवानांना वीरमरण आले आहे. या भ्याड हल्ल्याचा जगभरातून वेगवेगळ्या पद्धतीने निषेध व्यक्त केला जात आहे. बरेच नागरिक आपआपल्या पद्धतीने सोशल मीडियावरुन देखील निषेध नोंदवत आहे. काही तरुण व्हॉट्सअॅपवर डिपी, स्टेटस ठेवून तसेच फेसबुकवर पोस्ट लिहून निषेध व्यक्त करत आहेत. एका व्यक्तीने एका वेगळ्या पद्धतीने निषेध व्यक्त केला आहे. ‘पाकिस्तान मुर्दाबादचा’ नारा देणाऱ्यांना चिकन लेग पीसवर १० रुपयांचा डिस्काऊंट देण्यात येणार, असा निषेध नोंदवला जात आहे.

कुठे आहे हे चिकन स्टॉल

छत्तीसगडच्या बस्तर जिल्ह्यातील जगदालपूर शहरात अंजल सिंह यांचे चिकनचे स्टॉल आहे. छोट्याशा हातगाडीवर ते स्टॉल लावतात. त्यांच्या या स्टॉलवर कबाब, तंदूरी, लेग पिस आणि रुचकर मांसाहारी पदार्थ मिळतात. या स्टॉलवर येणाऱ्यांसाठी त्यांनी खास ऑफर ठेवली आहे. मात्र ही ऑफर त्याच व्यक्तींसाठी आहे ज्या व्यक्ती ‘पाकिस्तान मुर्दाबादचा’ नारा देतील. ‘पाकिस्तान मुर्दाबादचा’ नारा देणाऱ्यांना अंजल सिंह चीकन लेग पीसवर १० रुपयांचा डिस्काऊंट देत आहेत.


हेही वाचा – पुलवामा भ्याड हल्ल्याचा जगभरातून निषेध!

हेही वाचा – Pulwama Terror Attack : बॉलीवूडकरांनी नोंदवला निषेध


 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here