घरअर्थजगतSBI च्या ग्राहकांना येतायत बनावट मेल; बँकेने दिला सतर्कतेचा इशारा

SBI च्या ग्राहकांना येतायत बनावट मेल; बँकेने दिला सतर्कतेचा इशारा

Subscribe

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI) खातेदारकांना गेले काही दिवस बनावट अलर्ट मेल येत आहेत. त्यामुळे आता SBI ने सर्व खातेदारकांना सतर्कतेचं आवाहन केलं आहे. ऑनलाईन फसवणूक करणारे बनावट मेल करत असल्याचं SBI ने सांगितलं. जर असे कोणतेही ईमेल आले तर त्यावर क्लिक करु नका, असं बँकेने म्हटलं आहे.

गृह मंत्रालयाच्या राष्ट्रीय सायबर क्राइम रिपोर्टिंग पोर्टल https://cybercrime.gov.in/ वर या बनावट मेलची तक्रार करा. एसबीआयने असेही म्हटले आहे की इंटरनेट बँकिंगची https://www.onlinesbi.sbi/ ही वेबसाइट आहे. याशिवाय एसबीआय इंटरनेट बँकिंगसाठी इतर कोणत्याही वेबसाइटला भेट देऊ नका.

- Advertisement -

काही दिवसांपूर्वी SBI ने आपल्या ग्राहकांना बनावट कर्जाच्या ऑफरबाबत इशारा दिला होता. ‘एसबीआय लोन फायनान्स लिमिटेड’ आणि मुद्रा फायनान्स लिमिटेड या संस्थांच्या वतीने कर्ज देऊन काही अज्ञात लोक सर्वसामान्यांची फसवणूक करण्याचा प्रयत्न करीत आहेत. प्रत्यक्षात या कंपन्या अस्तित्वात नाहीत. स्टेट बँक ऑफ इंडियाचा ‘एसबीआय लोन फायनान्स लिमिटेड’ आणि ‘मुद्रा फायनान्स लिमिटेड’ शी संबंध नाही. ज्यांना कर्जाची गरज आहे त्यांनी थेट बँकेच्या जवळच्या शाखेशी संपर्क साधावा, असं SBI ने म्हटलं आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -