घरदेश-विदेशSBI मध्ये मोठी भरती; असा करा अर्ज

SBI मध्ये मोठी भरती; असा करा अर्ज

Subscribe

स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये प्रशिक्षणार्थ्यांसाठी नोकर भरती होत आहे. SBI ने प्रशिक्षणार्थी पदाच्या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज मागविले आहेत. देशातील विविध विभागांमध्ये ८५०० रिक्त पदे आहेत. १० डिसेंबरपर्यंत एसबीआय sbi.co.in वर जाऊन ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. प्रशिक्षणार्थी पदांच्या निवडीसाठी जानेवारी २०२१ मध्ये ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे. भरतीसाठी कोणतीही मुलाखत होणार नाही. ऑनलाईन परीक्षेत उत्तीर्ण होणार्‍या उमेदवारांची स्थानिक भाषेची चाचणी असेल. प्रशिक्षणार्थीचा कालावधी ३ वर्षे आहे. निवडलेल्या प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्याला बँकेत ३ वर्षांच्या कालावधीत IIBF परीक्षेत पात्र व्हावे लागेल.

शैक्षणिक पात्रता

- Advertisement -

कोणत्याही विषयात पदवी पदवी. (३१ ऑक्टोबर २०२० पूर्वी)

वय

- Advertisement -

३१/१०/२०२० पर्यंत उमेदवार किमान २० वर्षे आणि जास्तीत जास्त २८ वर्षे असावेत. ०१/११/१९९२ पूर्वी आणि ३१/१०/२००० नंतर ज्यांचा जन्म झाला असेल ते पात्र ठरणार नाहीत.
शासनाच्या नियमानुसार राखीव प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार जास्तीत जास्त वयात सवलत देण्यात येईल.

निवड
लेखी परीक्षा, स्थानिक भाषा चाचणी.

वेतन

प्रशिक्षणार्थीस पहिल्या वर्षाच्या कालावधीत प्रतिमहा १५,००० रुपये, दुसर्‍या वर्षाच्या कालावधीत १६,५०० रुपये आणि तिसऱ्या वर्षाच्या कालावधीत १९,००० रुपये व इतर भत्ते मिळतील.

कोणत्या राज्यात किती रिक्त जागा आहेत

महाराष्ट्र – ६४४
गुजरात ४८०
आंध्र प्रदेश – ६२०
कर्नाटक – ६००
मध्य प्रदेश – ४३०
छत्तीसगड – ९०
पश्चिम बंगाल – ४८०
ओडिशा – ४००
हिमाचल प्रदेश – १३०
हरियाणा – १६२
पंजाब – २६०
तामिळनाडू – ४७०
पॉन्डिचेरी – ६
दिल्ली – ७
उत्तराखंड – २६९
तेलंगणा – ४६०
राजस्थान – ७२०
केरळ – १४१
उत्तर प्रदेश – १२०६
अरुणाचल प्रदेश – २५
आसाम – ९०
मणिपूर – १२
मेघालय – ४०
मिझोरम – १८
नागालँड – ३५
त्रिपुरा – ३०
बिहार – ४७५
झारखंड – २००

महत्त्वाच्या तारखा
ऑनलाईन नोंदणी व फी भरण्याची शेवटची तारीख – १० डिसेंबर २०२०
ऑनलाईन अर्जाची छापील प्रत घेण्याची शेवटची तारीख – २५ डिसेंबर २०२०
ऑनलाईन परीक्षेची तारीख – जानेवारी २०२१

अर्ज फी
सामान्य/ओबीसी/ईडब्ल्यूएस – ३०० रुपये
एससी, एसटी, पीडब्ल्यूएडी – शुल्क नाही
फी डेबिट कार्ड/क्रेडिट कार्ड/इंटरनेट बँकिंगद्वारे दिली जाईल.

 या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करु शकता.

इथे संपूर्ण माहिती वाचा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -