घरदेश-विदेशनेट बँकींग वापरणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी

नेट बँकींग वापरणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी

Subscribe

नेट बँकींग वापरण्यासाठी वापरणाऱ्यांना महत्वाची सूचना स्टेट बँक ऑफ इंडियाने दिली आहे. याचबरोबर दररोज एटीएममधून पैसे काढण्याची मर्यादाही १ डिसेंबर पासून कमी करण्यात येणार आहे.

जर तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) चे नेट बँकींगचा वापर करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. १ डिसेंबर २०१८ पासून एसबीआयने तुमच्या खात्याशी जोडलेला मोबाइल नंबरची नोंदणी करणे आवश्यक असल्याचे सांगितले आहे. जर तुम्ही नोंदणीकेली नाही तर एसबीआयकडून मिळणारी इंटरनेट बँकीक सेवा बंद करण्यात येईल असे बँक अधिकाऱ्यांनी सांगितले. अधिक माहितीसाठी एसबीआयच्या अधिकृत संकेतस्थळावर जाण्याचे आवाहन बँकेतर्फे करण्यात आले. ज्या ग्राहकांनी आतापर्यंत मोबाईल नंबर नोंदणी केली नाही अशांना एसबीआय शाखेमध्ये जाऊन संपर्क साधावा लागेल. एटीएम ट्रांझाक्शनमध्ये होणारे धोके टाळण्यासाठी हे बदल करण्यात येणार आहेत. एसबीआयच्या नवीन नियमानुसार आता ग्राहक एक दिवशी २० हजार पर्यंतची रक्कम एटीएममधून काढू शकतील. हा नवा नियम ३१ ऑक्टोबर पासून लागू होणार आहे. यापूर्वी एका दिवशी ४० हजारापर्यंत रुपये काढण्याची परवानगी बँकेने दिली होती. ग्राहकांना ३० ऑक्टोबर पर्यंत ४० हजार रुपये काढता येणार आहेत.

खात्यात पैसे भरण्यासाठीचा नियम

एसबीआयद्वारे घेतलेल्या नव्या निर्णयानुसार ग्राहकांना येत्या काळात गैरसोय होण्याची शक्यता आहे. तुमच्या खात्यामध्ये फक्त तुम्हीच पैसे भरू शकणार आहेत. इतर कोणतीही व्यक्ती तुमच्या खात्यात पैसे भरू शकणार नाही अगदी तुमचे कुटुंबातील सदस्यही. नोटबंदीदरम्यान ५०० आणि १००० च्या नोटा जमा करण्यासाठी आलेल्या नागरिकांची चौकशी करण्यात आली होती. जमा करण्यात येणारी रक्कम त्यांना कोणी दिली याबद्दल त्यांना माहिती नसल्याचे आढळून आले. म्हणूनच बँकेने हा नियम बनवला आहे. तुम्हाला जर इतर खात्यात पैसे जमा करायचे असेल तर त्या खातेदाराचे अनुमती पत्र दाखवणे आवश्यक आहे. बँक स्लीपवर खातेदाराची सही असणे आवश्यक आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -