एसबीआयने घेतला हा निर्णय, आता इराणची गोची!

अमेरिकेने भारत आणि चीनसह १० देशांना निर्बंधांमधून सूट दिली असली, तरी एसबीआयने मात्र हे निर्बंध पाळणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

Mumbai
State Bank of India Logo
स्टेट बँक ऑफ इंडिया

आंतरराष्ट्रीय स्तरावर अमेरिकेने इराणवर लादलेल्या निर्बंधांमुळे वातावरण ढवळून निघालं आहे. अनेक आखाती देशांनी इराणला पाठिंबा दर्शवला असला, तरी अमेरिकेच्या निर्बंधांमुळे या देशांना आपला हात आखडता घ्यावा लागला आहे. त्याचदरम्यान भारत आणि चीनसह एकूण १० देशांना निर्बंधांमधून सूट देण्यात आल्याचं नुकतंच अमेरिकेच्या वाणिज्य विभागाकडून जाहीर करण्यात आलं आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय तेल कंपन्यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे. भारतात आयात होणाऱ्या कच्च्या तेलाचा बराच मोठा हिस्सा हा इराणमधून येतो. इराणलाही याचा फायदा होणार होता. मात्र, भारताच्या सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या एसबीआयने एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे इराणसह भारतीय तेल कंपन्यांच्या आराखड्यांना धक्का बसला आहे.

एसबीआयनं घेतली कठोर भूमिका

अमेरिकेने भारत आणि चीनसह १० देशांना निर्बंधांमधून सूट दिली असली, तरी एसबीआयने मात्र हे निर्बंध पाळणार असल्याचे स्पष्ट केले आहे. राऊटर्स या वृत्तसंस्थेने यासंदर्भातील वृत्त दिले आहे. त्यामुळे आता इराणपुढे नवा पेच निर्माण झाला आहे. कारण भारतीय तेल व्यवहारातला सर्वाधिक व्यवहार हा स्टेट बँक ऑफ इंडिामार्फत होतो. त्यामुळे जर एसबीआयने व्यवहार केले नाहीत, तर त्याचा थेट फटका इराणसोबतच्या तेल व्यवहारांना बसणार आहे.

आम्ही एक आंतरराष्ट्रीय बँक आहोत. आमची अमेरिकेतही मुख्य शाखा आहे. त्यामुळे आम्ही अमेरिकेच्या निर्बंधांना सुसंगत असंच धोरण राबवणार आहोत.

रजनीश कुमार, चेअरमन, एसबीआय

इराणला आवर घालण्यासाठी निर्बंध

इराणच्या अण्वस्त्र आणि क्षेपणास्त्र कार्यक्रमाला आवर घालण्यासाठी अमेरिकेने इराणवर तेल व्यवहार आणि आर्थिक निर्बंध लादले आहेत. तसेच, आखाती देशांमध्ये इराणचा वाढता लष्करी आणि राजकीय हस्तक्षेप कमी करण्यासाठी अमेरिकेने हे पाऊल उचलल्याचं सांगितलं जात आहे.


तुम्ही हे वाचलंत का? – नेट बँकिंग वापरणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here