एसबीआयने केले जवानांचे कर्ज माफ

स्टेट बँक ऑफ इंडियाने पुलवामा येथील हल्ल्यात शहिद झालेल्या २३ जवानांचे कर्ज माफ केल्याची घोषणा केली आहे. एसबीआयचे चेअरमन रजनीश कुमार यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली आहे.

Mumbai
jawan SBI
प्रातिनिधिक फोटो

पुलवामा हल्ल्यात शहिद झालेल्या ४० जवांनाच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या हल्ल्यानंतर देशात संतापाची लाट उसळली आहे. या शहिदांच्या नातेवाईकांना विविध पद्धतीने मदत केली जात आहे. शहिदांना आर्थिक मदत करण्यासाठी अनेक संस्था पुढे आल्या आहेत. अशातच देशातील सर्वात मोठ्या बँकेपैकी एक स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) ने शहिद जवांनाचे कर्ज माफ करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. एसबीआयचे चेअरमन रजनीश कुमार यांनी ट्विटरवरून ही घोषणा केली आहे. याच सोबत शहिदांच्या कुटुंबीयांना लवकरच वीम्याची रक्कम दिल्या जाणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. बँकेने दिलेल्या माहितीनुसार या जवानांच्या वीम्याची एकूण रक्कम ३० लाख रुपये आहे.

शहिदांच्या कुटुंबीयांसाठी विशेष सेवा

शहिंदाच्या कुटुंबीयांना मदत करण्यासाठी अनेकांनी तयारी दाखवली आहे. याचाच फायदा घेत काही समाज कंटकांनी खोट्या वेबसाइट्स उघडून ही रक्कम लंपास करण्याचे प्रकार उघडकीस आले आहे. यासाठी एसबीआयने एक नवी सेवा सुरु केली आहे. या सेवेतून सर्वसामान्यांना शहिदांना आर्थिक मदत करणे सोपे जाणार आहे. यासेवेमुळे त्यांचे पैसे हे शहिदांच्या खात्यात जाणार आहे. “भारत के वीर” असे या सेवेचे नाव आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here