घरदेश-विदेशबघता बघता शाळा नदीत वाहून गेली

बघता बघता शाळा नदीत वाहून गेली

Subscribe

आसाममध्ये मुसळधार पावसामुळे ब्रह्मपुत्र नदीला पूर आला आहे. या पुरात एक शाळा वाहून गेल्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे.

देशातील काही भागांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. ईशान्य भारतात तर पावसाने कहर केला आहे. आसाम जिल्ह्यातील सुमारे १५ लाख लोकांना पावसाच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. याशिवाय पावसामुळे अनेकांची घरे देखील वाहून जात आहे. दरम्यान, आसाम मध्ये ब्रह्मपुत्र नदीला पूर आला असून या नदीच्या पुरात एक शाळा वाहून गेल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने हा व्हिडिओ शेअर केला आहे. अवघ्या २६ सेकंदामध्ये ही शाळा वाहून गेली आहे.

- Advertisement -

परिस्थिती आणखीन गंभीर होण्याची शक्यता

आसामच्या मौरीगाव जिल्ह्यातील टेंगागुरी येथील ही घटना आहे. मुसळधार पावसामुळे या भागात ब्रह्मपुत्र नदीला पूर आला आहे. याशिवाय दिक्खू, धनसिरी, जिया भारती, पुतिमारी आणि बेकी या नद्यांना देखील पूर आला आहे. आसाममध्ये पूर परिस्थिती गंभीर होत जात असून या भागात सहाय्यासाठी सैन्य दलाला पाठवण्यात आले आहे. पावसामुळे आतापर्यंत राज्यात ६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. याशिवाय ७६४३ लोकांना स्थलांतरित करण्यात आले आहे. दरम्यान, परिस्थिती आणखीन गंभीर होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. कारण पुढील काही दिवसांमध्ये राज्यात मुसळधार पाऊस पडण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे.


हेही वाच – नेपाळमध्ये पावसाचा हाहाकार! ४३ जणांचा मृत्यू

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -