घरCORONA UPDATEऑनलाईन क्लासरूमच्या नावाखाली शिक्षकांची बनवा-बनवी!

ऑनलाईन क्लासरूमच्या नावाखाली शिक्षकांची बनवा-बनवी!

Subscribe

लॉकडाऊनमुळे सरकारीपासून खासगी शाळांपर्यंत सर्वांनी ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय निवडला आहे. मात्र या शिक्षणामध्ये कोणतीही मार्गदर्शक तत्वे देण्यात आली नसल्याने ऑनलाईन शिक्षणात गोंधळ असल्याचे पाहायला मिळत आहे. सर्व शाळा आपापल्या सोईने ऑनलाईन शिक्षण घेत आहेत. तसेच काही जण यु ट्यूबवरील व्हिडिओ विद्यार्थ्यांना पाठवून त्यांची शाळा घेत आहेत. विशेष म्हणजे ऑनलाईन वर्ग सुरू ठेवणाऱ्या शाळांना लॉकडाऊनमध्येही ट्युशन फि घेण्याची परवानगी देण्यात आली आहे. एकप्रकारे ही विद्यार्थी, पालकांची लूट असून ऑनलाईन क्लासरूमच्या नावाखाली शिक्षकांची बनवाबनवी सुरू असल्याचे दिसून येत आहे.

शाळेतून ऑनलाईन शिक्षणासाठी सहापेक्षा जास्त प्लॅटफॉर्मचा वापर केला जात आहे. वर्गावरील शिक्षकाच्या वेळेचे कोणतेही नियोजन त्यात नाही. काही शाळांनी तर विद्यार्थ्यांना अद्याप कोणतेही टाईमटेबल दिलेले नाही. त्यामुळे विद्यार्थी गोंधळात आहेत. काही शाळांकडून सायंकाळी गृहपाठ पाठवला जात आहे. एकावेळी दोन ते तीन विषयांचा अभ्यास व्हॉट्सअॅपवर पाठवला जात आहे. अशात विद्यार्थ्यांना एकाचवेळी सर्व विषयांचा अभ्यास करते कठिण होत आहे.

- Advertisement -

काही शाळा झूम अॅपवर अभ्यासक्रम पाठवत आहेत. त्यामुळे मुलांना ऑनलाईन शिक्षणावेळी प्रश्न विचारण्याचीही संधी मिळत आहे. शिक्षकदेखील अधूनमधून मुलांना अभ्यासाविषयी प्रश्न विचारत आहेत. ज्या शाळा युट्यूबच्या माध्यमातून अभ्यास पाठवत आहेत. तिथे विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्याची संधीच उपलब्ध नाही. जर मुलांना काही समजल नाही तर शिक्षकांना ते त्वरीत कळूच शकत नाही. त्यामुळे व्हॉट्सअॅप पाठवण्यात आलेल्या अभ्यासक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

हेही वाचा –

दिल्लीच्या हॉटेल-गेस्ट हाऊसमध्ये चिनी लोकांना बंदी!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -