घरCORONA UPDATEUnlock : लवकरच सुरू होतील शाळा; केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केली नियमावली

Unlock : लवकरच सुरू होतील शाळा; केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केली नियमावली

Subscribe

पुढील सोमवार, २१ सप्टेंबरपासून देशात शाळा सुरू होत आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शाळेतील मुलांच्या आरोग्यासंबंधी नियमावली जारी केली आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे यांनी रविवारी त्यांच्या ट्विटर हँडलवर ही नियमावली प्रसिद्ध केली आहे. आरोग्य मंत्रालयाने स्किल ट्रेनिंग इंस्टिट्यूट, उच्च शिक्षण संस्था यांच्याकरता स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर (एसओपी) जारी केली आहे. टेक्निकल प्रोग्राममधील कोर्सचा समावेश असणाऱ्या संस्थांना २१ सप्टेंबरपासून प्रयोगशाळा उघडण्याचीही परवानगी देण्यात आली आहे.

- Advertisement -

नियमावलीनुकसार वर्गामध्ये बसण्याच्या पद्धतीत बदल करण्यात येतील प्रत्येक विद्यार्थी एकमेकांपासून सहा फुटाच्या अंतरावर बसेल. त्यामुळे खुर्ची किंवा बेंचमधील अंतर ६ फुटाचे असणे आवश्य आहे. वर्गात आवश्यकतेनुसार सोशल डिस्टन्सिंगची काळजी घेणे बंधनकारक आहे. शिकवताना सर्वांनी मास्क परिधान करणे बंधनकारक आहे. विद्यार्थ्यांना लॅपटॉप, नोटवुक, स्टेशनरी एकमेकांसोबत वाटून घेण्याची परवानगी नाही.

हेही वाचा –

म्हाडातर्फे मुंबईकरांना भेट!; मुंबई-ठाण्यात हक्काच्या घराचं स्वप्न होणार साकार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -