Saturday, January 16, 2021
27 C
Mumbai
घर देश-विदेश चीनच्या उलट्या बोंबा! भारतानेच जगभर पसरवला कोरोना!!

चीनच्या उलट्या बोंबा! भारतानेच जगभर पसरवला कोरोना!!

कोरोना व्हायरस सर्वप्रथम भारतामुळेच पसरला, असा धक्कादायक दावा

Related Story

- Advertisement -

कोरोना व्हायरस सर्वप्रथम भारतामुळेच पसरला, असा धक्कादायक दावा चीनच्या काही संशोधकांनी केला आहे. चीनमधील वुहान प्रांतामधून २०१९ मध्ये कोरोनाने जन्म घेतला होता. मात्र आता शंघाई इंस्टीट्यूट फॉर बायोलॉजिकल साइंसेंजच्या संशोधकांनी हा व्हायरस भारताच्या उपमहाद्वीप भागातून आल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आता हा नवा वादाचा विषय बनला आहे. कोरोना व्हायरसमुळे चीनचे नाव आधीच खराब असून राग व्यक्त केला जात आहे. शिवाय अनेक उद्योगधंद्यानी चीनमधून काढता पाय घेतला. त्यामुळे चीन आता कोरोना व्हायरस पसरवण्याचा आरोप भारतावर करत आहे.

यापुर्वी चीनच्या काही अधिकाऱ्यांनी असे म्हटले होते की, कोरोना अमेरिकेतून वुहानमध्ये आल्याचे म्हटले होते. चीनने कोरोना व्हायरस लपवून ठेवण्याचा प्रयत्न केला होता, असा आरोप चीनवर करण्यात आला होता. शंघाई इंस्टीट्यूट फॉर बायोलॉजिकल साइंसेंजच्या संशोधकांनी अजीब दावा केला होता, कोरोना व्हायरस भारत किंवा बांग्लादेशकडून पसरला होता. १७ देशांमधील कोरोना व्हायरसच्या स्ट्रेनवर चीनच्या संशोधकांनी काही रिसर्च पेपर प्रकाशित केले होते.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, द लान्सेट मेडिकल जर्नलच्या प्री-प्रिंट प्लेटफॉर्म SSRN.Com वर चीनच्या संशोधकांचे रिसर्च पेपर प्रकाशित करण्यात आले. या रिसर्चचे नेतृत्व डॉ. शेन लिबिंग यांनी केले. भारतातील खराब वातावरण, वाढत जाणारी लोकसंख्या यामुळे हा व्हायरस पसरल्याचा दावा त्यांनी केला. चीनच्या संशोधकांनी दावा केला की, वुहानमध्ये कोरोनाच्या केस मिळण्यापूर्वी तीन-चार महिने आधीच भारताच्या महाद्विप भागात हा जीवघेणा कोरोना व्हायरस पसरला होता. मात्र भारताने हा आरोप खोटा असल्याचे म्हटले आहे.


कंगनानंतर आता अर्णब गोस्वामीवरुन सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारलं

- Advertisement -