घरताज्या घडामोडीदिल्ली हिंसाचार : कलम १४४ लागू, एक महिना संचारबंदी

दिल्ली हिंसाचार : कलम १४४ लागू, एक महिना संचारबंदी

Subscribe

CAA विरोधी आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने कलम १४४ लागू करण्यात आलं आहे. हिंसाचारात ९ जणांचा मृत्यू झाला असून १०० हून अधिकजण जखमी झाले आहेत.

दिल्लीत सीएए विरोधक आणि समर्थकांमध्ये कालपासून धुमश्चक्री उडाली आहे. यामुळे दिल्लीत हिंसाचार उफाळला आहे. कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी ईशान्य दिल्लीत कलम १४४ लागू करण्यात आले आहे. पुढील महिन्याभरासाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याचे विराधक आणि समर्थकांमध्ये सोमवारी एकमेकांवर दगडफेक केली. यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले. आज सकाळी देखील हिंसाचाराच्या घटना घडल्या. दोन गटांमध्ये तुफाण दगडफेक झाली. परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी जमावबंदी कलम १४४ लागू करण्यात आले. ही जमावबंदी पुढील एक महिना असणार आहे.

- Advertisement -

चांदबांग येथील आंदोलनस्थळी सोमवारी सीएए समर्थक आणि विरोधकांनी एकमेकांवर दगडफेक केली. या दगडफेकीत पोलीस हेड कॉन्स्टेबलचा मृत्यू झाला. त्यानंतर काही काळासाठी वातावरण थंड झाले होते. मात्र, आज पुन्हा एकदा दिल्लीतले वातावरण चिघळले. दिल्लीत उसळलेल्या हिंसाचारामुळे आतापर्यंत ९ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १०० हून अधिक लोक जखमी झले आहेत. अनेक ठिकाणी जाळपोळ करण्यात आली. आग नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे बंब पाचारण करण्यात आले होते. त्यांच्यावरही दगडफेक करण्यात आली.

काल सकाळी सातच्या सुमारास मौजपूर चौकात लोक सुधारित नागरिकत्व कायद्याच्या समर्थनार्थ बसले होते. तर, सकाळी दहाच्या दरम्याने मौजपूर चौकापासून २०० मीटर पुढे, कबीर नगर परिसरात लोक कायद्याच्या विरोधात रस्त्यावर उतरले. दरम्यान, अर्ध्या तासानंतर कबीर नगरमधील विरोधक आणि मौजपूर चौकातील समर्थक यांच्यात दगडफेक सुरु झाली.

- Advertisement -

हेही वाचा – ‘सीएए’ विरोधात दिल्लीत पुन्हा हिंसाचार, पोलिस कर्मचाऱ्यांसह ५ जणांचा मृत्यू

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -