सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे HIV चे प्रमाण वाढेल – स्वामी

'समलैंगिकता ही एक जेनेटिक डिसऑर्डर असून यामुळे STD अर्थात सेक्शुअल ट्रान्समिटेड डिसीजसारख्या लैंगिक आजारांमध्ये वाढ होईल, तसंच देशात HIV एड्सचे प्रमाणही वाढले,' असं स्वामी याचं म्हणणं आहे.

Mumbai
swamy-1505406097
'समलैंगिकतेमुळे देशात HIV एड्सचे प्रमाण वाढले,' असं सुब्रमण्यम स्वामी याचं म्हणणं आहे. (फाईल फोटो)

सुप्रीम कोर्टाने ‘एलजीबीटी’ कम्युनिटीच्या बाजूने निर्णय देत समलैंगिकता हा गुन्हा नसल्याचं गुरुवारी जाहीर केलं. मात्र, भाजपचे वरिष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी सुप्रिम कोर्टाच्या या निर्णयावर नाराजी दर्शवली असून, एक त्याविषयी एक वादग्रस्त विधान केले आहे. ‘सुप्रिम कोर्टाच्या या निर्णयामुळे एड्सच्या (HIV) प्रमाणात वाढ होईल’ असे विधान सुब्रमण्यम स्वामी यांनी केले आहे. दरम्यान सुप्रिम कोर्टाने दिलेला हा निर्णय सात न्यायाधीशांच्या खंडपीठाकडून पुन्हा बदलला देखील जाऊ शकतो, असंही स्वामी यांचं म्हणणं आहे. लैंगिक संबंधांना देण्यात आलेल्या कायदेशीर मान्यतेमुळे समाजात वाईट गोष्टींचा तसंच रोगांचा प्रसार होईल असं वक्तव्य स्वामी यांनी केले आहे. ‘समलैंगिकता ही एक जेनेटिक डिसऑर्डर असून यामुळे STD अर्थात सेक्शुअल ट्रान्समिटेड डिसीज सारख्या लैंगिक आजारांमध्ये वाढ होईल, तसंच देशात HIV एड्सचे प्रमाणही वाढले,’ असं स्वामी याचं म्हणणं आहे.

याआधीही केले होते वादग्रस्त विधान

याआधीही भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी कलम ३७७ विषयी वादग्रस्त विधान केले होते. ‘कलम ३७७ संपूर्णतः बंद करावा’ असे विधान सुभ्रमण्यम यांनी सुप्रिम कोर्टाच्या कालच्या सुनावणी आधीच केले होते. ”समलैंगिकता हे हिंदुत्व विरोधी असून, अशी मानसिकता असलेल्यांना उपचाराची गरज आहे. आपण या गोष्टीचा उत्सव करू शकत नाही. यासंबंधी वैद्यकीय संशोधनात गुंतवणूक करणे शक्य वाटत असेल तर तसे करावे. तसंच केंद्र सरकारला या प्रकरणी ७ ते ९ न्यायाधीशांच्या खंडपीठाची नियुक्ती करण्याबाबत विचार करावा”, अशी प्रतिक्रीया सुब्रमण्यम स्वामी यांनी ANI शी बोलताना व्यक्त केली होती. दरम्यान त्यांच्या या वक्तव्यानंतर गायिका सोना मोहापात्रा हिने ट्विटरवरून त्यांना प्रत्युत्तर दिले होतो. स्वामी यांची समज चुकीचे असल्याची टीका सोना मोहपात्राने केली होती.


वाचा : ‘समलैंगिक संबंध आरोग्यास हानीकारक’

 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here