घरदेश-विदेशझारखंडमध्ये चकमक; ५ नक्षलवाद्यांचा खात्मा

झारखंडमध्ये चकमक; ५ नक्षलवाद्यांचा खात्मा

Subscribe

५ नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. घटनास्थळावरुन पोलिसांनी २ एके- ४७, २ पिस्तूल आणि एक ३०३ रायफल असा शस्त्रसाठा जप्त केला.

झारखंडमध्ये नक्षलवादी आणि सुरक्षा दलामध्ये चकमक झाली. या चकमकीत पाच नक्षलवाद्यांना ठार करण्यात जवानांना यश आले आहे. झारखंडच्या चाईबासा येथे आज सकाळी ही चकमक झाली. या चकमकीनंतर घटनास्थळावरुन मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जवानांनी जप्त केला आहे. चकमकीत ठार झालेल्या नक्षलवाद्यांमध्ये पीएलएफआयचा कमांडो प्रभु साहब बोदराचा देखील समावेश आहे.

- Advertisement -

अशी झाली चकमक

झारखंडच्या सिंहभूम जिल्ह्याच्या पश्चिमेकडील खूंटी- चाईबासा सीमेवर नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये मंगळवारी सकाळी चकमक झाली. या भागात नक्षलींविरोधात सुरक्षा दलांकडून अभियान राबवले जात होते. शोधमोहीम सुरु असताना लपून बसलेल्या नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलाच्या जवानांवर गोळीबार केला. सुरक्षा दलांनीही नक्षलींना चोख प्रत्युत्तर दिले. या चकमकीत ५ नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले. घटनास्थळावरुन पोलिसांनी २ एके- ४७, २ पिस्तूल आणि एक ३०३ रायफल असा शस्त्रसाठा जप्त केला.

- Advertisement -

काय आहे पीएलएफआय

झारखंडमध्ये पीपल्स लिबरेशन फ्रंट ऑफ इंडियाची स्थापना दिनेश गोपच्या नेतृत्वाखाल करण्यात आली होती. दिनेश गोपचा मोठा भाऊ सुरेश गोपची २००३ मध्ये हत्या करण्यात आली होती. भावाच्या हत्येनंतर दिनेश गोपने पीपल्स लिबरेशन फ्रंट ऑफ इंडियाचे कामकाज स्वत:च्या हातात घेतले. दिनेशने पीपल्स लिबरेशन फ्रंट ऑफ इंडियाचे संगठन गुलमा, पालकोट, रायडीह, घाघरा, विशनुपूर, सिसई, कमाडारामध्ये मजबूत केले होते. या दरम्यान सीपीआय नक्षलवादीचे सदस्य मासी चरण पूर्ती याने दिशेन गोपच्या सोबत मिळून एक संगठन केले. मासी चरण पूर्तीसोबत येऊन भाकपा माओवादीच्या अनेक सदस्यांनी पीपल्स लिबरेशन फ्रंट ऑफ इंडियाचे सदस्यत्व मिळवले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -