घरदेश-विदेशगुंगीचे औषध देऊन सुरक्षा रक्षकाचा विद्यार्थिनीवर बलात्कार

गुंगीचे औषध देऊन सुरक्षा रक्षकाचा विद्यार्थिनीवर बलात्कार

Subscribe

दिल्लीच्या एका नामांकित महाविद्यालयात एका २३ वर्षीय विद्यार्थिनीवर महाविद्यालयाच्या सुरक्षा रक्षकाने बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आरोपीने पीडितेला कोल्ड ड्रिंकमध्ये गुंगीचे औषध देऊन बलात्कार केला.

दिल्ली विद्यापीठाच्या एका नामांकित महाविद्यालयात सुरक्षा रक्षकाकडून विद्यार्थींनिवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर दिल्लीमध्ये महिला सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले आहेत. बलात्कार करणाऱ्या सुरक्षा रक्षकाने विद्यार्थीनिला कोल्ड ड्रिंकमध्ये गुंगीचे औषध टाकले होते. त्यानंतर तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी बलात्कार करणाऱ्या नराधमाला बेड्या ठोकल्या आहेत.

गेल्या काही महिन्यांपासून पीडित विद्यार्थिनी नैराश्यात

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महाविद्यालयाच्या सुरक्षा रक्षकाने ऑगस्ट २०१८ रोजी विद्यार्थिनीवर बलात्कार केला होता. परंतु, पीडित विद्यार्थिनी या घटनेनंतर नैराश्यात जावून घाबरली होती. गेल्या दहा दिवसांपूर्वी तिने या घटनेबाबत आपल्या मैत्रीनींना सांगितले. त्यानंतर पोलिसांकडे तक्रार करण्यात आली. पोलिस विद्यार्थिला एलएनजेपी रुग्णालयात घेऊन गेले आणि तिथे मेडीकल केले गेले. यामध्ये पीडितेवर अत्याचार झाल्याची बाब उघड झाली. त्यानंतर पोलिसांनी त्या नराधमला अटक केली.

- Advertisement -

नेमकं काय आहे प्रकरण?

पीडित विद्यार्थिनी आपल्या परिवारासोबत नवी दिल्लीच्या एका परिसरात वास्तव्यास आहे. ज्या दिवशी ही घटना घडली त्यादिवशी ती महाविद्यालयात गेली होती. यावेळी २५ वर्षीय गेट किपर राजकुमारने तिला कोल्ड ड्रिंक पिण्याची ऑफर दिली. त्या कोल्ड ड्रिंकमध्ये गुंगीचे औषध टाकण्यात आले होते. त्यामुळे ते कोल्ड ड्रिंक पिल्यानंतर विद्यार्थिनीला चक्कर येऊ लागले आणि तिचे भान हरपले. त्यांनंतर आरोपी तिला महाविद्यालयातील एका रुममध्ये घेऊन गेला. तिथे त्याने विद्यार्थीनीवर बलात्कार केला. विद्यार्थीनिला जेव्हा जाग आली तेव्हा तिचे आंगावरचे कपडे इकडे-तिकडे फेकले गेले होते. तिने हा सर्व प्रकार आपल्या मैत्रीनींना सांगितला. महाविद्यालय प्रशासनाला जेव्हा या घटनेची माहिती मिळाली तेव्हा महाविद्यालय प्रशासनाने पोलिसांत तक्रार दाखल केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -