घरट्रेंडिंगअॅड गुरू अॅलेक पदमसी कालवश

अॅड गुरू अॅलेक पदमसी कालवश

Subscribe

ज्येष्ठ जाहिरातकार अॅलेस पदमसी यांचे निधन झाले आहे. ते ९० वर्षांचे होते.

ज्येष्ठ जाहिरातकार अॅलेस पदमसी यांचे वयाच्या ९० व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांना सरकारकडून पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले होते. त्यांनी रिचर्ड अॅटनबरा यांच्या ‘गांधी’ चित्रपटात काम केले आहे. त्यांची या चित्रपटात मोहम्मद अली जिनाचे पात्र साकारले होते. त्यांची ही भूमिका फार गाजली होती. पदमसी हे जाहिरातज्ज्ञ होते. त्यांच्या अनेक जाहिरातीसुद्धा चांगल्याच लोकप्रिय ठरल्या होत्या. ते लिंटास या प्रसिद्ध जाहिरात कंपनीचे १४ वर्ष मुख्य कार्यकारी अधिकारी राहिले आहेत. बऱ्याच कंपन्यांच्या यशामागे पदमसी यांनी महबत्त्वाची भूमिका बजावली आहे.

‘या’ आहेत पदमसी यांच्या प्रसिद्ध जाहिराती

पदमसी यांनी भरपूर जाहिराती केल्या आहेत. यामध्ये त्यांना भरपूर यश मिळाले आहे. त्यातील हमारा बजाज, एमआरएफ मसल मॅन, सर्फ,लिरील गर्ल, चेरी ब्लॉसम, शू पॉलिस,कामसूत्र कपल,टीव्ही डिरेक्टिव्ह कमरमचंद आणि फेअर अॅंड लव्हली सारख्या अनेक जाहिराती चांगल्याच गाजल्या आहेत. पदमसी यांच्या जाण्याने संपूर्ण जाहिरात क्षेत्रात शोक व्यक्त केला जात आहे. दरम्यान देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी दु:ख व्यक्त केले आहे.

- Advertisement -


हेही वाचा – राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची रणबीर – आलियाशी भेट

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -