काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल आयसीयूत

ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात कोरोनाची लागण झाली होती

काँग्रेस नेते अहमद पटेल

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांना कोरोनाची लागण झाली असून प्रकृती बिघडली आहे. अहमद पटेल यांना ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात कोरोनाची लागण झाली होती. तेव्हापासून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

गुडगावमधील मेदांता रुग्णालयात अहमद पटेल यांना पुढील उपचारासाठी गुडगावमधील मेंदाता रुग्णालयात दाखल करण्यात आले असून आयसीयूत ठेवण्यात आले असल्याची माहिती कुटुंबाने दिली आहे. ७१ वर्षीय अहमद पटेल यांनी १ ऑक्टोबर रोजी आपल्याला कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती दिली होती. अहमद पटेल यांचा मुलगा फैसल यांनी ट्विट केले असून दिलेल्या माहितीनुसार, अहमद पटेल यांना काही आठवड्यांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती.