घरताज्या घडामोडीकाँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांचं कोरोनामुळे निधन

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांचं कोरोनामुळे निधन

Subscribe

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांचं आज पहाटे निधन झाले. त्यांनी ७१ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. एक महिन्यापूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचार सुरू असतानाच आज पहाटे त्याचे निधन झाले. याबाबतची माहिती अहमद पटेल यांचा मुलगा फैजल पटेल यांनी ट्विटद्वारे दिली. अहमद पटेल यांच्या निधनामुळे काँग्रेसवर शोककळा पसरली आहे.

अहमद पटेल यांचा मुलगा फैजल पटेल यांनी ट्विटरद्वारे सांगितले की, माझे वडील अहमद पटेल यांचं निधन झाल्याची घोषणा जड अंतःकरणाने करावी लागत आहे. आज सकाळी ३.३० वाजता आपल्या वडिलांना अखेरचा श्वास घेतला. एक महिन्यांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू होते. पण उपचारादरम्यान त्यांच्या शरीरातील अनेक अवयवांनी काम करणे बंद केलं. यामुळे त्यांचा मृत्यू झाला. गुरुग्राम येथील मेदांता रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या आत्मास शांत मिळो.’

- Advertisement -

पुढे त्यांनी सगळ्यांना आवाहन केलं की, ‘गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा आणि कोरोना नियमांचं पालन करा. तसेच नेहमी सोशल डिस्टन्सिंगचं पालन करा.’

- Advertisement -

१५ नोव्हेंबरला अहमद पटेल यांना मेदांता रुग्णालयातील आयसीयूमध्ये दाखल केले होते. १ ऑक्टोबर अहमद पटेल यांनी स्वतः ट्विट करून आपण कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याची माहिती दिली होती.

७१ वर्षांचे अहमद पटेल तीन वेळी लोकसभा सदस्य राहिले होते. तर ५ वेळा राज्यसभेचे खासदार होते. ऑगस्ट २०१८ मध्ये काँग्रेसचे पक्षाचे कोषाध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती. अवघ्या २६ व्या वर्षी १९७७ मध्ये अहमद पटेल भरूच लोकसभा मतदारसंघातून संसदेत पोहोचले होते. १९९३ पासून ते राज्यसभेचे खासदार होते. काँग्रेसमधील विश्वासू नेत्यांपैकी ते एक होते.


हेही वाचा – काँग्रेस पक्षाच्या पायाभरणीत पटेल यांचे मोठे योगदान; पंतप्रधान मोदी, राष्ट्रपतींनी वाहिली


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -