घरदेश-विदेशआंध्र प्रदेश : गोदावरी नदीत ६१ पर्यटकांना घेऊन जाणारी बोट उलटली; ११...

आंध्र प्रदेश : गोदावरी नदीत ६१ पर्यटकांना घेऊन जाणारी बोट उलटली; ११ जणांचा मृत्यू

Subscribe

गोदावरी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अदनान अस्मी यांनी सांगितले की, दुर्घटना नेमकी घडली कशी याबाबत माहिती घेतली जात आहे. आंध्र प्रदेश पर्यटन विकास महामंडळाच्यवतीने चालवल्या जात असलेल्या या बोटीत ६१ जण होते, ज्यामध्ये ११ चालक सदस्यांचाही समावेश होता. ही बोट कच्चुलुरूजवळ उलटली.


आंध्र प्रदेशातील पूर्व गोदावरी जिल्ह्यातील गोदावरी नदीमध्ये आज, रविवारी दुपारी पर्यटकांची बोट बुडाल्याची घटना समोर येत आहे. या बोटीतून ६१ जण प्रवास करत असल्याचे सांगितले जात असून यामधील १५ पर्यटकांना वाचवण्यात यश आल्याची माहिती स्थानिक पोलिसांनी दिली आहे. घटनास्थळी एनडीआरएफची टीम दाखल झाली असून पर्यटकांना शोधण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.

- Advertisement -

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बुडालेल्यांपैकी अद्यापर्यंत २३ जणांना वाचवण्यात यश आलेलं आहे. घटनास्थळी ३० जवानांची एनडीआरएफची दोन पथकं दाखल झाली असून बुडालेल्या पर्यटकांना शोधण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी मृतांच्या कुटूंबीयांना १० लाखांची मदत जाहीर केली आहे.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -