घरदेश-विदेश'सरन्याधीशांच्या विरोधात षडयंत्र रचणाऱ्यांचे आपल्याकडे सीसीटीव्ही फुटेज'

‘सरन्याधीशांच्या विरोधात षडयंत्र रचणाऱ्यांचे आपल्याकडे सीसीटीव्ही फुटेज’

Subscribe

सरन्याधीशांच्या विरोधात षडयंत्र रचनाऱ्यांच्या विरोधात आपल्याकडे ठोस पुरावे असल्याचा दावा वकील उत्सव बैन्स यांनी केल आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांनी सोशल मीडियावर आरोप करणाऱ्या महिलेच्या बाजूने खटला लढण्यासाठी दीड कोटी रुपयांची ऑफर आल्याचा खुलासा केला होता.

सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्याविरोधात सुप्रीम कोर्टाच्या एका माजी महिला कर्मचाऱ्याने लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. हे आरोप रंजन गोगोई यांनी फेटाळले आहेत. दरम्यान याप्रकरणी एका वकिलाने मोठा दावा केला आहे. दोन दिवसांपूर्वी त्याने फेसबुकवर पोस्ट टाकली होती. त्या पोस्टमध्ये रंजन गोगोई यांच्या विरोधात षडयंत्र रचले जात आहे, असे म्हटले होते. याशिवाय त्या महिलेच्या बाजूने निवडणूक लढवावी यासाठी आपल्या दीड कोटी रुपयांची ऑफर आल्याची माहिती त्या वकिलाने दिली होती. या वकिलाचे नाव उत्सव बैन्स असे आहे. बैन्स यांनी आता नवा दावा केला आहे. सरन्यायाधीश यांच्या विरोधात षडयंत्र रचना फार मोठा असून त्याचे सीसीटीव्ही फुटेज आपल्याजवळ आहेत. हे सीसीटीव्ही फुटेज आपण देशाच्या प्रमुख तपास यंत्रणेला देऊ, असे बैन्स यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

सुप्रीम कोर्टाने तीन न्यायाधीशांची नेमली समिती

याप्रकरणी सुप्रीम कोर्टाने न्यायमुर्ती शरद बोबडे यांच्या अध्यक्षतेखाली तीन न्यायाधीशांची समिती नेमली आहे. यासंदर्भात शरद बोबडे यांनी स्वत: माहिती दिली आहे. रंजन गोगोई यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांची ‘इन हाऊस’ पद्धतीने चौकशी करण्याचे सुप्रीम कोर्टाने ठरवले आहे. सुप्रीम कोर्टाने नेमलेल्या समितीमध्ये न्यायमुर्ती एन. वी. रमन आणि न्यायमूर्ती इंदिरा बॅनर्जी आहेत. रमन हे बोबडे हे वरिष्ठ आहेत. त्यामुळे त्यांची निवड करण्यात आल्याचे स्पष्टीकरण बोबडे यांनी दिले आहे तर. तर इंदिरा बॅनर्जी या महिला न्यायाधिश आहेत, त्यामुळे त्यांना या समितीत नेमले गेल्याचे बोबडे यांनी सांगितले.


हेही वाचा –‘सरन्यायाधीशांच्या विरोधात षडयंत्र रचण्यासाठी मला दीड कोटींची ऑफर’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -