घरदेश-विदेशमसूद अझहर पाकिस्तानातच; अखेर पाकिस्तानची कबुली

मसूद अझहर पाकिस्तानातच; अखेर पाकिस्तानची कबुली

Subscribe

जैश ए मोहम्मद संघटनेचा म्होरक्या मसूद अझहर हा पाकिस्तानातच असल्याची कबूली पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांनी दिली आहे.

जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अझहर हा पाकिस्तानातच असल्याची कबूली पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह मुहम्मद कुरेशी यांनी दिली आहे. मसूद अझहर आजारी आहे, असंदेखील त्यांनी सांगितलं आहे. पुलवामा दहशतवादी हल्ल्यापासून भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमधील संबंध ताणले गेले आहेत. पुलवामाचा भ्याड हल्ल्याचा जगभरातून निषेध करण्यात आला. या हल्ल्यात भारताचे ४० पेक्षा जास्त जवान शहीद झाले. दरम्यान, जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेनं या हल्ल्याची जबाबदारी स्विकारली. दरम्यान, पाकिस्तानने मसूद अझहर पाकिस्तानात नसल्याची माहिती दिली होती. पाकिस्तानकडून दहशतवादाविरोधात ठोस पाऊल उचलली जात नसल्याचे पाहून भारताने बदला घेण्याचं ठरवलं. २६ फेब्रुवारीला सकाळी पाकिस्तानमध्ये शिरुन भारतीय हवाई दलाने हवाई हल्ला करुन जैशचे दहशतवादी तळ उद्ध्वस्त केली.

नेमकं काय म्हणाले शाह मुहम्मद कुरेशी?

गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या तणावग्रस्त परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर अखेर पाकिस्तान नरमवली आहे. पाकिस्तानने जैश ए मोमहम्मदचा म्होरक्या पाकिस्तानात असलयाची कबूली दिली आहे. ‘मसूद हा प्रचंड आजारी असून, तो घराबाहेर पडू शकत नाही’, अशी माहिती शाह मुहम्मद कुरेशी यांनी दिली आहे. त्यासोबतच ‘भारताने पुरावे दिले तर मसूदवर कारवाई करु’, असंदेखील कुरेशी म्हणाले आहेत.

- Advertisement -

हेही वाचा –पंजाब सीमारेषेवर पाकिस्तानी गुप्तहेराला अटक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -