महिला आरक्षणासाठी राजकीय पक्षांनी एकत्र यावं – पवार

महिला धोरणाचा २५ वर्षाचा टप्पा पूर्ण होत आहे. त्यामुळे सर्व राजकीय पक्षांनी महिला आरक्षणासाठी एकत्र यावं असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे.

Pune
NCP Chief Sharad Pawar
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार

महिला धोरणाचा २५ वर्षाचा टप्पा पूर्ण होत आहे. त्यामुळे सर्व राजकीय पक्षांनी महिला आरक्षणासाठी एकत्र यावं असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे. संकट काळात जनतेनं केलेल्या मागणीला हो म्हणण्याचं काम राजकीय पक्ष करतात असे देखील यावेळी शरद पवार यांनी म्हटलं आहे. महिला स्वयंसिद्धतेकडे वाटचाल या कार्यक्रमामध्ये शरद पवार बोलत होते. महिलांना कमी लेखता कामा नाही. यावेळी त्यांनी पोलिस खात्यातील उदाहरण दिले. पोलिस खात्यातील महिलांवर विश्वासानं जबाबदारी का नाही टाकली जात? या महिला पोलिसांना केवळ बंदोबस्तासाठीची कामं का दिली जातात? महिला अधिकाऱ्यांना मोठी जबाबदारी दिली जावी. त्यामुळे त्यांच्या क्षमतेमध्ये देखील वाढ होईल. त्यांच्या कर्तृत्वामध्ये कमतरता नाही. त्यांतर देखील त्यांना संधी का नाही दिली जात? असा सवाल यावेळी शरद पवार यांनी उपस्थित केला. ही मानसिकता बदलायला हवी असं मत देखील यावेळी शरद पवार यांनी व्यक्त केलं.

महिलांबाबत संंपत्ती अधिकारांची देखील नीटपणे अंमलबजावणी होत नाही. यावेळी महिला कुटुंबात कलह नको असा विचार करतात. वडिल, भाऊ यांना त्रास होऊ नये असं त्यांना वाटतं. नात्यांमध्ये कटुता येऊ नये असा विचार महिला करतात. महिलांनी आता विचारामध्ये बदल करण्याची गरज आहे. असं मत देखील यावेळी शरद पवारांनी व्यक्त केलं. यावेळी सुप्रिया सुळे, शिवसेना आमदार नीलम गोऱ्हे देखील यावेळी उपस्थित होते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here