घरदेश-विदेशशेअर बाजार कोलमडला; गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान

शेअर बाजार कोलमडला; गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान

Subscribe

आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किंमतीत आणि डॉलरच्या तुलनेत रुपयांची घसरण झाल्याने शेअर बाजार कोलमडला आहे. यामुळे गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले आहे.

कच्च्या तेलांच्या वाढलेल्या किंमतीत आणि अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयांची घसरण झाल्याने याचा फटका शेअर बाजारला बसला आहे. शेअर बाजार कोलमडल्यामुळे गुंतवणूकदारांना याचा मोठा फटका बसला असून गुंतवणूकदांचे कोटी रुपये बुडाले आहेत. सेन्सेक्समध्ये ५५० अंकांची घसरण झाली असल्याने निफ्टीही ११ हजारांच्याखाली गेला आहे. तर शेअर बाजाराच्या आजच्या पडझडीमुळे गुंतवणूकदारांचे १.७९ लाख कोटी रुपये बुडाले आहेत. तर मुंबई शेअर बाजारामधील लिस्टेड कंपन्यांचे १४५ लाख रुपये बुडाले आहे तर १४३.४३ लाख कोटी रुपये वाचले आहेत.

याला बसला मोठा फटका

आज शेअर बाजारमध्ये मोठ्या प्रमाणात चढ-उतार सुरु होता. सेन्सेक्समध्ये मोठी घसरण झाल्याने याचा सर्वाधिक फटका महिंद्रा अँड महिंद्राला बसला आहे. महिंद्राचे ६.८० टक्के शेअर पडले. सेन्सेक्स ५५० अंकांच्या घसरणीसह ३५ हजार ९७५ अंकावर बंद झाला तर निफ्टी १५० अंकांच्या घसरणीसह १० हजार ८५८ अंकांवर बंद झाला. तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किंमतीत आणि डॉलरच्या तुलनेत रुपयांची होत असलेली घसरण या दोन्ही कारणांमुळे गुंतवणूकदांमध्ये नाराजी पसरली आहे. तर बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमधील लिस्टेड कंपन्यांचे १४५ लाख कोटी रुपये बुडाले आहेत तर १४३.४३ लाख कोटी वाचले आहेत.

- Advertisement -

रुपयांची सर्वाधिक निच्चांकी घसरण

आजची सर्वाधिक निच्चांकी घसरण आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयांमध्ये सर्वाधिक ही मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. एका डॉलरसाठी ७३ रुपये ३४ पैसे मोजावे लागणार आहेत. शेअर बाजारात घसरण झाल्याने एचडीएफसी बँक, अॅक्सिक बँक, कोटक बँक, टाटा मोटार्स, टाटा स्टील, विप्रो, सन फार्मा, रिलायन्स यांचे सर्वाधिक मोठे नुकसान झाले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -