घरदेश-विदेश'ज्याची भीती होती, तेच घडलं' - शर्मिष्ठा मुखर्जी

‘ज्याची भीती होती, तेच घडलं’ – शर्मिष्ठा मुखर्जी

Subscribe

राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी संघाच्या कार्यक्रमाला नागपूरमध्ये उपस्थिती तर लावली. मात्र, संघाच्या कार्यक्रमातील फोटोला मॉर्फ्ड केल्यामुळं मुखर्जी यांची मुलगी शर्मिष्टानं तिच्या ट्विटर हँडलवर नाराजी व्यक्त केली आहे. ‘अखेर ज्याची भीती होती, तेच घडलं. भाजप आणि संघाच्या ‘डर्टी ट्रीक्स डिपार्टमेंट’नं त्यांना जे करायचं होतं ते केलंच.’ असं शर्मिष्ठानं आपल्या ट्विटमध्ये नमूद करत नाराजी दर्शवली.

कसा आहे मॉर्फ्ड फोटो

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाला माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी हजेरी लावली. त्यांनी या कार्यक्रमाला जाऊ नये असं त्यांची मुलगी शर्मिष्ठा मुखर्जीला वाटत होतं. तिनं त्याबद्दल आपलं मत व्यक्त केलं होतं. पण तरीही प्रणव मुखर्जी या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. त्यांचा संघातील कार्यक्रमाचा मोर्फ्ड फोटो व्हायरल झाला असून यामध्ये प्रणव मुखर्जी संघ नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना अभिवादन करत असल्याचे दाखवण्यात आलंय. तर दुसऱ्या फोटोमध्ये प्रणव मुखर्जी यांनी संघाची काळी टोपी घातल्याचं दाखवण्यात आलं आहे.

- Advertisement -

कार्यक्रमाला जाण्याआधी केली होती भीती व्यक्त

‘या घटनेनंतर तरी प्रणव मुखर्जींना कळायला हवं, भाजपाचं ‘डर्टी ट्रीक्स डिपार्टमेंट’ कसं काम करतं. तुमचं भाषण लोक विसरतील, मात्र तुमचे व्हिज्युल्स कायम राहतील आणि हे फोटो चुकीच्या मजकुरासह व्हायरल केले जातील’ अशी भीती नागपूरला जाण्यापूर्वीच शर्मिष्ठानं आपल्या ट्विटद्वारे व्यक्त केली होती.

प्रणव मुखर्जींनी कार्यक्रमात मांडलं होतं मत

एकभाषा, एक धर्म म्हणजे राष्ट्रवाद नाही. एक राष्ट्रध्वज, भारतीय म्हणून असणारी ओळख आणि कोणाशीही शत्रुत्व नाही या तत्त्वांवर सात प्रमुख धर्मांचा समावेश असलेली १३० कोटी जनता ‘वसुधैव कुटुंबकम्’ या तत्त्वावर गुण्यागोविंदाने नांदत आहे आणि तोच खरा राष्ट्रवाद आहे, असं परखड मत माजी राष्ट्रपती आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रणव मुखर्जी यांनी संघाच्या व्यासपीठावरून व्यक्त केलं होतं.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -