घरदेश-विदेशमंदिरात तुला करताना शशी थरूर जखमी; डोक्याला ६ टाके

मंदिरात तुला करताना शशी थरूर जखमी; डोक्याला ६ टाके

Subscribe

काँग्रेसचे माजी मंत्री आणि खासदार शशी थरूर एका मंदिरात दर्शनासाठी गेले होते. त्या मंदिरात तुला करताना पडले असून, त्यांच्या डोक्याला ६ टाके पडले आहेत.

लोकसभा निवडणुकीचे सर्व ठिकाणी वारे वाहु लागले आहेत. प्रचारासाठी सगळे रत्यावर, शेतात, रेल्वे स्टेशनवर, सामान्यांच्या घरी पोहचले आहे, तसेच मंदीरात जाऊ लागले आहेत. मात्र, याच निवडणुकीच्या प्रचारा दरम्यान काँग्रेसचे माजी मंत्री आणि खासदार शशी थरूर हे सोमवारी १५ एप्रिल रोजी तिरूवअनंतपुरम येथील एका मंदिरातदर्शनासाठी गेले असताना पूजेच्या विधीदरम्यान तुला करताना पडले. यात त्यांच्या डोक्याला मार लागला आहे. तात्काळ थरूर यांना जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले. तसेच थरूर यांच्या जखमेच्या ठिकाणी ६ टाके पडले आहेत. मात्र, डॉक्टरांनी त्यांची प्रकृती चिंताजनक नसल्याचे सांगितले आहे.

- Advertisement -

मंदिरात तुसा करताना जखमी

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत तिरूवअनंतपुरममधून शशी थरूर हे काँग्रेस पक्षातर्फे लढत लढणार आहेत. आज प्रचारास सुरूवात करण्याआधी मंदिरात दर्शनासाठी गेले होते. दरम्यान, थंपानूर येथील गंधारी अमन कोवित मंदिरात शशी थरूर यांची तुला करण्यात येत होती. त्यावेळी थरूर हे एका तराजुमध्ये तर दुसऱ्या तराजुमध्ये काही साहित्य ठेवण्यात आले होते. त्यावेळी थरूर यांच्या समोरिल तराजुमधील साहित्य कमी जास्त झाल्यामुळे थरूर यांचा तोल जाऊ खाली पडले. दरम्यान त्यांच्या डोक्याला दुखापत होऊन ६ टाके पडले आहे. मात्र, आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -