अंत्यविधी करण्यास मंदिर प्रशासनाने दिला नकार

मुस्लीम धर्मात लग्न केल्यानंतर महिलेचा धर्म बदलल्याचे कारण देत मंदिराने अंत्यविधी करण्यास दिला नकार.

New Delhi
hindu antywidhu
प्रातिनिधिक फोटो

मृत हिंदू पत्नीचा अंत्यविधी करण्यावर मंदिर प्रशासानाने बंदी घताल्याची घटना उघडकीस आली आहे. या महिलेनी मुस्लीम जातीत लग्न केल्यामुळे तिचा अंत्यविधी हिंदू पद्धतीने केला जाऊ शकत नसल्याचे मंदिराच्या वतीने सांगण्यात आले. मुस्लीम जातीत लग्न केल्यानंतर महिला हिंदू राहिली नसल्याने ही बंदी घालण्यात आली. या मयत महिलेचे नाव निवेदिता होते. इम्तियाझ उर रहेमान असे या महिलेच्या पतीचे नाव आहे. मूळ हे दोघे कोलकाता येथे राहत होते. मागील काही महिन्यांपासून ही महिला अजारी असून दिल्लीतील एका रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरु होते. उपचारादरम्यान या महिलेचा मृत्यू झाल्यावर तिचा अंत्यसंस्कार हिंदू पद्धतीने करण्यात आला होता. मात्र अंतिमसंस्कारानंतर करण्यात येणाऱ्या विधी पार पाडण्यास मंदिराने नकार दिला आहे.

इम्तियाझ उर रहेमान हे व्यासयिक कर विभागात सहाय्यक आयुक्त पदावर कार्यरत आहेत. पत्नीच्या मृत्यूनंतर तिचे श्राद्ध करण्यासाठी रहेमान यांनी चित्तरंजन पार्कयेथील काली मंदिर सोसायटीतील मंदिर बुक केले होते. येत्या १३ तारखेला हा कार्यक्रम होणार असून यासाठी ६ तारखेला त्यांनी मंदिराला माहिती दिली होती. मात्र महिलेने मुस्लीम धर्मात लग्न केल्यामुळे मंदिरांनी श्रद्धासाठी जागा देण्यास मनाई केली. त्यांना कारण विचारले असता मंदिरप्रशासनाने उडवाउडवीची उत्तरे दिली.

मंदिर प्रशासनाने दिलेले स्पष्टीकरण

मंदिर प्रशासनाने यावर दिलेल्या स्पष्टीकरणानुसार इम्तियाझ यांनी स्वतःची ओळख लपवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी मंदिराचा हॉल मुलीच्या नावावर बुक केला. मदिराचे अध्यक्ष अस्थीत्व भैमिक यांनी सांगितले की,”आम्हाला महिलेच्या धर्माबद्दल माहिती नव्हते. ब्राम्हणांनी या महिलेचे गौत्र विचारले असता त्याच्या जवळ याचे उत्तर नव्हते. मुस्लीम गैत्र पाळत नाहीत. लग्नानंतर या महिलेला हिंदू म्हणून गृहित धरले जाणार नाही. तसेच महिलेने लग्नानंतर मुस्लिम अडणाव जोडले होते. हिंदू धर्मातील परंपरा आणि अधिकार यांच्या विरुद्ध जाऊन श्राद्धाची परवानगी आम्ही देऊ शकत नाही.”