घरदेश-विदेशधक्कादायक ! बालिका गृहात मुलींना दिले जायचे 'ड्रग्ज'

धक्कादायक ! बालिका गृहात मुलींना दिले जायचे ‘ड्रग्ज’

Subscribe

लैंगिक अत्याचाराला बळी पडलेली बालिका गृहातील १३ वर्षाच्या मुलीला या बालिका गृहातून पळून जाण्यात यश मिळाले आणि तिने झाला सगळा प्रकार पोलिसांना सांगितला.. तिन सांगितले की...

बिहारमधील मुजफ्फरपुर येथील बालिकागृहात मुलींवर होणाऱ्या लैंगिक अत्याचाराच्या बातमीने संपूर्ण देशाला हादरवून सोडले. मुलींच्या या लैंगिक अत्याचारात अनेक राजकारणींची नावे पुढे आली. त्याच दरम्यान ऑगस्ट महिन्यात उत्तर प्रदेशातील देवरिया येथील एका बालिका गृहातील सेक्स स्कँडलचा पदार्फाश करण्यात आला होता. आता अधिक तपासात अनेक धक्कादायक गोष्टी समोर आलेल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार येथील अल्पवयीन मुलींना जबरदस्ती सेक्ससाठी पाठविले जायचे आणि विशेष म्हणजे त्यांना आपल्यासोबत काय झाले हे कळू नये यासाठी ड्रग्ज दिले जायचे, असा खुलासा या बालिका गृहातील एका मुलीने केला आहे. या प्रकरणाशी निगडीत ४ आरोपींना उत्तर प्रदेशातील वेगवेगळ्या भागातून ताब्यात घेण्यात आले आहे.

काय म्हणाली पीडित?

लैंगिक अत्याचाराला बळी पडलेली बालिका गृहातील १३ वर्षाच्या मुलीला या बालिका गृहातून पळून जाण्यात यश मिळाले आणि तिने झाला सगळा प्रकार पोलिसांना सांगितला. तिन सांगितले की, आम्हाला पोलिसांशी नीट बोलू नका असे सांगितले जायचे. तर पोलीस वगळता इतर बडी आसमी आली की, त्यांच्यासोबत मौजमजा करा असे सांगितले जायचे. त्यांच्यासोबत आम्हाला पाठवण्यापूर्वी गिरिजा ताई आम्हाला काहीतरी खायला द्यायची. आणि सांगायची की, तुम्हाला आता दुखणार नाही. शिवाय तुम्ही बाहेर कोणाला सांगितलं तर मारुन टाकण्याची धमकी द्यायची. तर दुसऱ्या १२ वर्षाच्या मुलीने जबाबात सांगितले की, संध्याकाळी ४ वाजता गाडी यायची आम्हाला घेऊन जायची नेहमी वेगवेगळे पुरुष असायचे. कधी बाईक देखील असायची. आमच्यासोबत वाईट वाईट करुन आम्हाला दुसऱ्या दिवशी सोडले जायचे. असा धक्कादायक खुलासा या दोघांनी अलाहाबाद कोर्टापुढे केला आहे.

- Advertisement -
वाचा –मुझ्झफरपूर प्रकरण : सामाजिक न्याय मंत्री मंजू वर्मांचा राजीनामा

कामही द्यायचे

धककादायक बाब म्हणजे लैंगिक खुलास्यासोबतच मुलींची अधिक चौकशी केल्यानंतर या ठिकाणी मुलांना क्षमतेहून अधिक कामे दिली जायची. धुणी भांडी सारखी कामे केली नाहीत तर त्यांना जेवणही दिले जायचे नाही,असे देखील समोर आले आहे.

वाचा- झोपेचे औषध देऊन चिमुरडयांवर केला जात होता ‘बलात्कार’

 

- Advertisement -

नेमकं प्रकरण काय ? 

ऑगस्ट २०१८ मध्ये बालिकागृहातील १२ वर्षांची मुलगी पळून गेली. तिची शोध मोहिम सुरु झाली. ती सापडल्यानंतर पोलिसांनी केलेल्या चौकशीत या मुलींवरील लैंगिक अत्याचाराचे प्रकरण प्रकाशझोतात आले. पण त्या आधी २०१७ साली बालिकागृहातील अनेक गैरप्रकार आणि अनियमितता पाहता बालिका गृह बंद करण्याचे आदेश देण्यात आले होते आणि येथील मुलींना स्थलांतरीत करा, असे देखील आदेश दिले होते.  बालिका गृह बंद करण्यासाठी १५ हून अधिक नोटीस पाठवल्या होत्या. पण त्याकडेही बालिका गृहाने दुर्लक्ष केले.अखेर ७ ऑगस्ट २०१८ ला बालिकागृहातील लैंगिक अत्याचाराचे प्रकरण समोर आले. याचा  तपास एसआयटी (SIT)कडे सुपुर्द करण्यात आला. पण  हा तपास योग्य सुरु नसल्याचे ताशेरे अलाहाबाद हायकोर्टाने ओढल्यानंतरआता हा नवा खुलासा समोर आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -