घरदेश-विदेशएनडीएचं निकालपूर्व सहभोजन; ३६ पक्ष हजर

एनडीएचं निकालपूर्व सहभोजन; ३६ पक्ष हजर

Subscribe

दिल्लीत आज, मंगळवारी सायंकाळी एनडीएच्या सर्व घटक पक्षांच्या प्रमुखांची बैठक पार पडली. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या हजेरी होणाऱ्या बैठकीमध्ये एकूण ३६ घटक पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

दिल्लीत आज, मंगळवारी सायंकाळी एनडीएच्या सर्व घटक पक्षांच्या प्रमुखांची बैठक पार पडली. या बैठकीत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, युवा सेना नेता आदित्य ठाकरे, पक्षाचे सचिव मिलिंद नार्वेकर आणि ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांनी उपस्थिती दर्शवली. लोकसभा २०१९ निवडणुकीच्या निकालाच्या दोन दिवस आधी दिल्लीत एनडीएच्या घटक पक्षांची बैठक ही राजकीय वर्तुळातील महत्त्वाची बाब समजली जात आहे. त्यामुळे या बैठकीला आणखी कोण कोण उपस्थित राहिले याकडेही सर्वांचेच लक्ष लागले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीमध्ये एकूण ३६ घटक पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

ही आहे घटक पक्षाची यादी

  1. शिवसेना
  2. जनता दल युनायटेड
  3. ऑल इंडिया अन्ना द्रविड मुनेत्र कडगम
  4. अकाली दल
  5. राष्ट्रीय लोक जनशक्ती पार्टी
  6. पट्टाली मक्कल कट्ची
  7. देसिया मूर्पोक्कु द्रविडा कडगम
  8. अपना दल
  9. असम गण परिषद
  10. रिपल्बिकन पार्टी ऑफ इंडिया
  11. नॅशनल पिपल्स पार्टी
  12. गोवा फॉरवर्ड पार्टी
  13. इंडिजिनस पिपल्स फ्रंट ऑफ त्रिपुरा
  14. राष्ट्रीया लोकतांत्रिक पार्टी
  15. नॅशनल डेमोक्रेटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी
  16. तामिल मनीला काँग्रेस
  17. राष्ट्रीय समाज पक्ष
  18. केरळ काँग्रेस
  19. भारतीय धर्मजन सेना
  20. ऑल झारखंड स्टूडेंट युनीटन
  21. बोडोलँड पिपल्स फ्रंट
  22. राभ हसौंग जॉईंट मुव्हमेंट
  23. पूथिया तमिल्गम कट्ची
  24. निषाद पार्टी
  25. सिक्किम डेमोक्रेटिक फ्रंट
  26. गणशक्ती
  27. ऑल इंडिया मुव्हमेंट मुन्नानी कडगम
  28. तमिझागा मक्कल मूनेत्र कडगम
  29. टीएन कोंगू इलाइग्नार पेरवई
  30. कोनगुनाडु मुन्नेत्र कडगम
  31. नागा पिपल्स फ्रंट
  32. ऑल इंडिया समाथुवा मक्कल कट्ची
  33. इंडिया मक्कल कलवी मुन्नेत्र कडगम
  34. पुराची भारतम
  35. गोरख जन मुक्ति मोर्चा
  36. ऑल इंडिया एन आर काँग्रेस कट्ची

या घटक पक्षांची अनुपस्थिती 

एकूण ३९ घटक पक्षांचा एनडीएमध्ये समावेश असून यातील ३६ पक्षच आजच्या बैठकीला उपस्थित होते. मात्र तीन घटक पक्ष यावेळी गैरहजर होते. यामध्ये तिवा जातिया ओइकिया मंच, युनाइटेड डेमोक्रेटिक पार्टी आणि मिजो नॅशनल फ्रंट यांचा समावेश आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -