घरताज्या घडामोडीबिहार निवडणुकीत आता शिवसेनेची काँग्रेसला साथ

बिहार निवडणुकीत आता शिवसेनेची काँग्रेसला साथ

Subscribe

भाजपला धडा शिकवण्यासाठी शिवसेना बिहार विधानसभा निवडणुकीत उतरणार हे आधीच निश्चित झाले होते. आता शिवसेनेने काँग्रेसला साथ देत भाजपशी दोन हात करण्याचा निर्णय घेतला आहे. सुशांत सिंह प्रकरणात महाराष्ट्राची आणि विशेष करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची बदनामी करत भाजपने मतांसाठी मोठी वातावरणनिर्मिती केली होती. यामुळे दुखावलेल्या शिवसेनेने या निवडणुकीत भाजपची कोंडी करण्याचा निर्णय घेतला आहे.

विधानसभेच्या ५० जागांवर सेना आपले उमेदवार उभे करतील, अशी घोषणा शिवसेनेचे खासदार अनिल देसाई यांनी केली आहे. बिहारमधले स्थानिक पक्ष शिवसेनेशी हातमिळवणी करण्यासाठी इच्छुक आहेत. त्या पक्षांबाबतही निर्णय घेण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. बिहारमध्ये काँग्रेस आणि शिवसेना एकत्र येत निवडणूक लढवू शकते, असे संकेतही देसाई यांनी दिले आहेत.

- Advertisement -

सुशांत सिंह प्रकरणात खोटा प्रचार करण्यात आला. खोटी माहिती पसरविण्यात आली. महाराष्ट्राला बदनाम करण्याचे कारस्थान रचले गेले; पण आता सगळं चित्र स्पष्ट झालं आहे. एम्सकडून सुशांतची हत्या नसून आत्महत्या झाल्याचे स्पष्ट करण्यात आल्यामुळे भाजपचा खोटा प्रचार उघडा पडला आहे, याकडे देसाई यांनी लक्ष वेधले.

देवेंद्र फडणवीस हे भाजपकडून निवडणुकीचे नियोजन करत आहेत. मात्र, त्यांनी महाराष्ट्राची बदनामी करू नये, असा टोलाही देसाई यांनी हाणला. बिहारचे माजी पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांच्या विरोधातही शिवसेना आपला उमेदवार देणार आहे. बिहारमध्ये शिवसेनेला धनुष्यबाण हे चिन्ह मिळणार नाही तसेच चिन्ह दुसर्‍या पक्षाचे असल्याने आयोग देईल त्यातले एक चिन्ह आम्ही निवडू, अशी माहितीही त्यांनी दिली.

- Advertisement -

सुशांत सिंह हा बिहारचा असल्याने त्याच्या मृत्यू प्रकरणावरून बिहारमध्ये मोठे राजकारण झाले होते. सुशांतला न्याय मिळाला पाहिजे, असे म्हणत भाजप आणि जनता दल युनायटेड हा मुद्दा प्रचारात उतरविण्याचा प्रयत्न करत होता. मात्र आणि एम्सच्या निर्वाळ्यानंतर परिस्थिती बदलली आहे. आता भाजप आणि जनता दलाकडे महत्त्वाचा मुद्दा नसल्याने ते पुन्हा एकदा विकासाचे गाजर दाखवू शकतात. मात्र, लालू प्रसाद यांच्या जनता दलाने प्रचारात भाजप आणि जनता दलाचा खोटा प्रचार उघडा पाडण्यासाठी कंबर कसल्याचे चित्र आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -