दिवाळीसाठी घरी निघालेल्या मजुरांवर काळाचा घाला; १० जणांचा मृत्यू, ९ जण जखमी

वाहनचालकाचा व्हॅनवरील ताबा सुटल्याने गाडी उलटली आणि हा भीषण अपघात झाला.

shivpuri accident pickup van overturned 10 Dead
दिवाळीसाठी घरी निघालेल्या मजुरांवर काळाचा घाला; १० जणांचा मृत्यू, ९ जण जखमी

दिवाळीच्या मुहूर्तावर अपघातांची संख्या वाढू लागली आहे. मध्यप्रदेशात एक भीषण अपघात झाला आहे. ऐन दिवाळीत प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या पिक अप व्हॅनला भीषण अपघात झाला आहे. अपघातस्थळी मदतीसाठी पोहचण्याआधीच व्हॅनमधील १० लोकांचा जागीच मृत्यू झाला होता. वाहनचालकाचा व्हॅनवरील ताबा सुटल्याने गाडी उलटली आणि हा भीषण अपघात झाला आहे.

घटनेची तीव्रता एवढी भीषण होती की १० जणांचा जागीच मृ्त्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. या अपघातात ९ जण जखमी झाले आहेत. जखमींना तात्काळ पोहरीतील एका सरकारी रूग्णालयात दाखल करण्यात आले. व्हॅनमध्ये एकूण ४० प्रवासी होते. त्यापैकी १० जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये ६ पुरूष आणि ४ महिलांचा समावेश आहे. मध्यप्रदेशच्या शिवपुरी पोहरीजवळ हा अपघात झाला. गाडीचालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने व्हॅन उलटून अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.

व्हॅनमध्ये प्रवास करणारे लोक हे मजुर होते. दिवाळीनिमित्त हे मजूर आपल्या घरी जाण्यास निघाले होते. शिवपुरी जिल्ह्यातील पोहरीहुन पिक व्हॅन प्रवाशांना घेऊन विजयपूरकडे निघाली होती. पोहरीहून पिकअप व्हॅन सुमारे ७ किलोमीटर पुढे आली. पिकअप व्हॅनमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसवण्यात आले होते. प्रवासादरम्यान व्हॅन चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. अचानक एका वळणावर व्हॅन उलटून अपघात झाला. दिवाळीसाठी घरी परत जाणाऱ्या मजुरांच्या अपघाती मृत्यूमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.


हेही वाचा – Video: गुजरातमधील प्लास्टिक कारखान्याला भीषण आग; नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू