शिवसेना मोदींना घाबरले, त्यांना फक्त आग्रलेख लिहिता येतात – ओवैसी

शिवसेनेने दादरच्या शिवाजी पार्कमध्ये आयोजित केलेल्या दसरा मेळाव्यात राम मंदिराचा मुद्दा मांडला. त्याचवेळी सेनेचे खासदार संजय राऊत यांनी एमआयएम पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांच्यावर टिका केली होती. त्यावर आता ओवैसी यांनी उत्तर दिले आहे.

Hyderabad
Asaduddin owaisi
एमआयएम अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी

शिवसेना वरपंगी कितीही आव आणत असली तरी आतून पंतप्रधान मोदींना घाबरते. त्यामुळेच सत्तेतून बाहेर पडण्याऐवजी सामनात अग्रलेख लिहीण्याचा नवा प्रयोग सुरू केल्याची टीका ऑल इंडिया इत्तेहादूल मुसलमीनचे (एआयएमआयएम) खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी केली आहे. मुंबईतील दसरा मेळाव्यात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राम मंदिर निर्माणावरून सरकारला चांगलेच धारेवर धरले. अयोध्येत राम मंदिर उभारण्याच्या मुद्यावरून राऊत म्हणाले होते की, तोंडी तलाक आणि एससी-एसटी कायद्यातील तरतुदींबाबत केंद्र सरकार अध्यादेश लागू करू शकत असेल, तर राम मंदिराच्या प्रश्‍नावर हा मार्ग का अवलंबला जात नाही? राम मंदिर हा जनभावनेचा विषय असल्यामुळे त्यावरील तोडगा न्यायालयात निघू शकत नाही. हा राजकीय इच्छाशक्तीचा भाग आहे आणि पंतप्रधान मोदी हा निर्णय घेऊ शकतात’, असे राऊत म्हणाले होते. तसेच खासदार ओवेसी यांनी स्वत:ला हैदराबादपुरतेच मर्यादित ठेवावे. राम मंदिर अयोध्येमध्ये होणार आहे. हैदराबाद, पाकिस्तान किंवा इराणमध्ये नाही! ओवेसी यांच्यासारखे नेते राजकारणाच्या नावाखाली मुस्लिम समुदायाला चुकीच्या दिशेने नेत आहेत. असा आरोप करत भविष्यात ओवेसींना याचा फटका बसेल’, असे विधान राऊत यांनी केले होते.

 

दसरा मेळाव्यातील खासदार संजय राऊत यांच्या या शाब्दीक हल्ल्याने संतापलेल्या ओवैसी यांनी आज, शनिवारी यासंदर्भात ट्वीट करून शिवसेनेवर टीकास्त्र सोडले. या ट्वीट नंतर पत्रकारांशी बोलताना ओवैसी म्हणाले की, शिवसेना मोदी यांना घाबरते. त्यामुळे केवळ सामनातून अग्रलेखच लिहिले जातात. आता अग्रलेख लिहिणे सोडून त्यांनी मोदी आणि फडणवीस सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घ्यावा,असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here