घरदेश-विदेशसेनेच्या याचिकेवर उद्या सुनावणी; कॉंग्रेसचा नेता सेनेची खिंड लढवणार

सेनेच्या याचिकेवर उद्या सुनावणी; कॉंग्रेसचा नेता सेनेची खिंड लढवणार

Subscribe

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाली असताना, आता शिवसेनेने सुप्रीम कोर्टाचा दरवाजा ठोठावला आहे. या याचिकेवर बुधवारी सुनावणी होणार आहे.

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाली असताना, आता शिवसेनेने सुप्रीम कोर्टाचा दरवाजा ठोठावला आहे. सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी पुरेसा अवध न दिल्यामुळे शिवसेनेने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल हे शिवसेनेची बाजू मांडणार आहेत, अशी माहिती शिवसेना नेते अॅड. अनिल परब यांनी दिली असून या याचिकेवर उद्या, बुधवारी सकाळी न्या. शरद बोबडे यांच्या खंडपीठात सुनावणी होणार आहे.

तीन दिवसांचा मागीतला होता अवधी

शिवसेनेने सत्तास्थापनेच्या दाव्यासाठी राज्यापालांकडे तीन दिवसांचा अवधी मागितल होता. मात्र, राज्यापालांनी त्याला नकार दिला आहे. शिवसेनेने त्यावर आक्षेप घेत सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे.

- Advertisement -

‘राज्यपालांनी आम्हाला केवळ २४ तासांचा वेळ दिला. मात्र, सर्व पक्षांच्या पाठिंब्याची पत्रे असो किंवा आमदारांच्या सह्या असो. कागदपत्रांची जुळवाजुळव, किमान सामायिक कार्यक्रम राबवण्यासाठी २४ तास हा कालावधी अपुरा आहे. राज्यपालांनी आपल्या अधिकारात सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी पक्षाला पुरेसा वेळ द्यायचा असतो’, असं अनिल परब यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे.


हेही वाचा – राज्यपालांकडून महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची अधिकृत शिफारस


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -