धक्कादायक! ५ वर्षांच्या चिमुकलीला जन्मदात्याने गळफास लावून स्वतः केली आत्महत्या!

shocking incident father hanged his 5 year old daughter committed suicide in andhra pradesh
धक्कादायक! ५ वर्षांच्या चिमुकलीला जन्मदात्याने गळफास लावून स्वतः केली आत्महत्या!

एकीकडे देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढताना दिसत आहे. देशातील कोरोनाबाधितांची संख्या ४० लाख पार झाली आहे. तर दुसरीकडे या कोरोना महामारीच्या काळात आत्महत्या करण्याच्या घटना समोर येत आहे. कुणी उपासमारीमुळे आत्महत्या करत आहेत तर कुणी वैयक्तिक कारणांमुळे आत्महत्या करत आहे. दरम्यान एका व्यक्ती आपल्या ५ वर्षांच्या मुलीला गळफास देऊन स्वतः देखील आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना आंध्रप्रदेश मधली असून आत्महत्या करण्यापूर्वी त्या व्यक्तीने एका सेल्फी व्हिडिओ केल्याचे समोर आले आहे.

या आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव गणेश असे असून तो आंध्रप्रदेशमधील चित्तूर जिल्ह्यात राहणारा होता. त्याने शुक्रवारी आपल्या ५ वर्षांच्या मुलीची गळफास लावून हत्या करून स्वतः आत्महत्या केली. पोलीस जेव्हा घटनास्थळी पोहोचली तेव्हा मुलीचा मृतदेह बाथरुममध्ये लटकलेला आढळला. तर वडील गणेशचा मृतदेह त्याचा रुममध्ये पंख्याला लटकलेला सापडला. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी तपास सुरू केला. या तपासादरम्यान पोलिसांचा एक सेल्फी व्हिडिओ मिळाला. ज्यामध्ये गणेशने या घटनेमागचे नेमके कारण सांगितले होते.

व्हिडिओमध्ये गणेशने सांगितले होते की, ‘घटस्फोट झाल्यानंतर पत्नीकडून मुलीची कस्टडी मिळू शकली नाही. त्यामुळे गणेश हे टोकाचे पाऊल उचलले. गणेशचे लव्ह मॅरज झाले होते. पण लग्नानंतर पत्नीच्या अफेअरमुळे त्याने घटस्फोट घेतला होता. घटस्फोट झाल्यानंतर त्याची पत्नी मुलीला टॉर्चर करत होती. यासाठी तो मुलीची कस्टडी घेऊ इच्छित होता. पण मुलगी त्याला मिळाली नाही.’ त्यामुळे शेवटी त्यांने मुलीला गळफास देऊन स्वतः आत्महत्या केली.


हेही वाचा – Video: महिलेचा जीव वाचवण्यासाठी अग्निशमन दलाचा जवान झाला स्पायडर मॅन!