घरदेश-विदेशधक्कादायक! बाप्पाच्या गळ्यातून चोरला नोटांचा हार

धक्कादायक! बाप्पाच्या गळ्यातून चोरला नोटांचा हार

Subscribe

चोराने बाप्पाच्या गळ्यातील ५१ हजार रुपये किमतीच्या नोटांचा हार चोराने लंपास केला. सीसीटीव्हीच्या फुटेजवरच मंडळाच्या अध्यक्षांना चोराची ओळख पटवणं शक्य झालं.

गेल्या १० दिवसांपासून राज्यभरात आनंदाने आणि उत्साहाने गणशोत्सव साजरा केला जात आहे. मात्र, उद्या (रविवारी) गणपती बाप्पाचे विसर्जन होणार असल्यामुळे सध्या सगळीकडे विसर्जन मिरवणुकीची तयारी सुरु आहे. सर्वचजण आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्याचा तयारीला लागले आहेत. मात्र, गणेशोत्सवाचे शेवटचे २ दिवस शिल्लक असताना पुन्हा एकदा चोरीची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मध्यप्रदेशच्या इंदौरमध्ये एका सार्वजनिक गणेश मंडळात चोराने थेट बाप्पाच्या गळ्यातील नोटांचा हार चोरला आहे. दरम्यान CCTV मध्ये कैद झालेला हा चोरीचा व्हिडिओ सध्या सोशल मिडायवर चांगलाच व्हायरल होतो आहे. काही दिवसांपूर्वीच मुंबईतील वडाळ्याचा राजा या नावजलेल्या गणपतीचे १५ लाख रुपयांचे दागिने चोरीला गेले होते. त्यानंतर आता इंदौरमध्येही चोराने थेट बाप्पावरच डल्ला घातल्यामुळे गणेश भक्तांमध्ये संतापाचे वातावरण पाहायला मिळते आहे.


वाचा: इंधन दरवाढीचा गणपती विसर्जनाला फटका

उपलब्ध माहितीनुसार इंदौरच्या जयारामपूर कॉलनीमधल्या सिद्धिवानायक गणेश मित्र मंडळात हा लाजीरवाणा प्रकार घडला. इथल्या बाप्पाच्या गळ्यातील ५१ हजार रुपये किमतीच्या नोटांचा हार चोराने लंपास केला. इथला गणपती मुंबईतील लालबागच्या राजाची प्रतिकृती आहे. मंडपामध्ये बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये ही संपूर्ण घटना कैद झाली. सीसीटीव्हीच्या फुटेजवरच मंडळाच्या अध्यक्षांना चोराची ओळख पटवणं सोपं झालं. दरम्यान या संपूर्ण घटनेची लेखी तक्रार नोंदवण्यात आली असून स्थानिक पोलीस चोराचा शोध घेत आहेत.


ऐका : मुंबईच्या पहिल्या सार्वजनिक बाप्पाची कहाणी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -