घरताज्या घडामोडीधक्कादायक! रस्त्यावरच्या कुत्र्यांचा मेकओव्हर, कान- शेपटी कापून केली विक्री!

धक्कादायक! रस्त्यावरच्या कुत्र्यांचा मेकओव्हर, कान- शेपटी कापून केली विक्री!

Subscribe

रस्त्यावर फिरणाऱ्या भटक्या कुत्र्यांची अनेकांना भिती वाटते. पण अनेकांना या कुत्र्यांचा लळा ही असतो. अशाच काही प्राणी मित्रांमुळे कुत्र्याची अवैध विक्री करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. नवभारत टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार गाझीयाबादच्या उच्चभ्रू वस्तीमध्ये हा प्रकार सुरू असल्याचं समोर आलं आहे.

या परिसरात राहणाऱ्या गुप्ता नावाच्या ग्रुहस्थांना रस्त्यावरच्या टॉमी नावाच् कुत्र्याचा लळा होता. पण सतत मागे मागे येणारा टॉमी एकेदिवशी अचानक गायब झाला. असाचप्रकारे परिसरातील इतर कुत्रेही गायब झाले. हाच अनुभव अनेक श्वानप्रेमींना येऊ लागला. त्यामागे नक्की काहीतरी गौंजबंगाल असा संशय श्वानप्रेमींना आला.

- Advertisement -

पिपल ऑफ Animal नावाच्या संस्थेने तपास केल्यानंतर एक धक्कादायक गोष्ट समोर आली. या उच्चभ्रू वस्तीत कुत्र्यांच्या अवैध विक्रीचं रॅखेट सुरू असल्याचं या संस्थेला आढळलं. हा प्रकार ऑनलाईन सुरू होता. रस्त्यावरच्या भटक्या कुत्र्यांना उचलायचं, त्यांचा मेकओव्हर करून त्यांना विदेशी कुत्र्याप्रमाणे बनवायचं आणि विकायचं अशी ती प्रक्रिया होती.

या संस्थेने अनेक ठिकाणी छापे मारले आणि ३५ कुत्र्यांची सुटका केली. या कुत्र्यांमध्ये देशी आणि संकरीत अशा दोन्ही प्रकारचे कुत्रे आहेत. त्याच्यावर प्लॅस्टिक सर्जरी करून त्यांचे रूप बदलण्यात येत होते. त्यांच्या तोंडाचा आकार बदलण्यात आला काहींचे कानही कापले होते. कुत्रे विदेशी जातीचे वाटावेत आणि जास्त किंमतीत विक्री करता यावी यासाठी हा प्रकार करण्यात आला.

- Advertisement -

या संस्थेने उठवलेल्या आवाजमुळे ८ ऑनलाईन विक्रीची पेजेस बंद करण्यात आली. या पेजेसवर आधी कुत्र्यांना दत्तक घेण्याबाबत विचारणा होत असे. मग येणाऱ्या व्यक्तीला त्याची किंमत भरायला लावत असे. प्लॅस्टिक सर्जरी करून विदेशी कुत्र्याची विक्री तब्बल चाळीस हजारांच्या पुढे केली जात असे.


हे ही वाचा – शोविकला ताब्यात घेणारा NCB चा अधिकारी आहे ‘या’ अभिनेत्रीचा पती!


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -