अमेरिकेच्या मेफेअर मॉलमध्ये गोळीबार, ८ जण जखमी

गोळीबारात जखमी झालेल्या लोकांना गंभीर दुखापत झालेली नाही. त्यांना उपचारांसाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Shooting at Mayfair Mall in the US 8 injured
अमेरिकेच्या मेफेअर मॉलमध्ये गोळीबार, ८ जण जखमी

अमेरिकेतील विस्कॉन्सिन येथील मेफेअर मॉलमध्ये शुक्रवारी गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात ८ जण जखमी झाले आहेत. गोळीबार करणारा आरोपी अद्याप फरार आहे. पोलिस फरारीचा शोध घेत आहेत. शुक्रवारी दुपारच्या सुमारास मेफेअर मॉलमध्ये गोळीबार करण्यात आला. विस्कॉन्सिनचे महापौर डेनिस मॅकब्राइड यांनी दिलेल्या माहितीनुसार गोळीबारात जखमी झालेल्या लोकांना गंभीर दुखापत झालेली नाही. त्यांना उपचारांसाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मॉलमध्ये झालेल्या गोळीबारानंतरचे व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

अमेरिकेतील मेफेअर मॉलमध्ये शुक्रवारी दुपारच्या सुमारास अंदाधुंद गोळीबार करण्यात आला. गोळीबार झाल्यानंतर ७५ पोलिसांचा ताफा घटनास्थळी पाठवण्यात आला होता. गोळीबारात कोणाला गंभीर दुखापत झाली नाही. घटनास्थळी मोठ्या संख्येत रूग्णवाहिका बोलवण्यात आल्या होत्या. आरोपीची शोध घेण्यासाठी पोलिस मॉलचा कानाकोपरा शोधून काढत आहेत. त्याचबरोबर मेफेअर मॉलमध्ये पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे.

प्रत्यक्षदर्शीने सांगितल्यानुसार, गोळीबाराचा आवाज ऐकून मॉलमधील ग्राहक बाहेरून बाहेर पळू लागले. मॉलमधील स्टॉफने चलाखीने मॉलचा मुख्य दरवाजा बंद करून ग्राहकांना मॉलच्या मागच्या भागात नेण्यात आले. त्याचबरोबर मॉलच्या मागच्या बाजूच्या खोलीत ग्राहक आणि सहा कर्मचारी बंद झाले होते. हे लोक पोलिस आल्यावरच खोलीतून बाहेर पडले. पोलिस घटनास्थळी पोहचताच गोळीबार करणारा आरोपी तिथून फरार झाला. पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत.


हेही वाचा – भारतातल्या या गावात एक व्यक्ती सोडून सगळे झाले कोरोना पॉझिटिव्ह!